
विजयपूरात पत्रकार दिन, वार्षिक प्रशस्ती, प्रतिभा पुरस्कार कार्यक्रम
विजयपूर : अलीकडे ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली अपराधी, गुन्हेगारी स्वरूपाचा बातम्यांचे अधिक प्रसारित करण्यात येत असते, त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे ही चिंतेची बाब असून नकारात्मक बातम्या ऐवजी सकारात्मक बातम्यांना प्राधान्य देण्यात यावे, असे मत मोठ्या व मध्यम उद्योग खात्याचे मंत्री व जिल्हा पालकमंत्री डॉ. एम. बी. पाटील यांनी व्यक्त केले.
शहरातील कंदगल हणमंतराय रंगमंदिरात जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार दिन, वार्षिक प्रशस्ती प्रधान व विद्यार्थी विद्यार्थिनी प्रतिभा पुरस्कार कार्यक्रमांचे उद्घाटन करुन बोलताना ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातील विविध प्रकल्प विकास कामे सुरू असतात, विविध समस्यांवर बैठकीचे आयोजन करण्यात आले असते त्या बैठकीचा सारांश टीव्हीवर दाखविले जात नाहीत याचे खेद वाटतो. त्या ऐवजी बाहेर येऊन एखादं राजकीय विधानास प्राधान्य दिले जाते.
पूर्वी सर्वत्र वृत्तपत्रे हे वाचकांसाठी माहितीचे स्त्रोत होते तेव्हा विश्वासाहर्ता महत्त्वाची होती. टीव्ही, यूट्यूब, सोशल नेटवर्किंगच्या भरभराटीचा कालावधीत वृत्तपत्रे व पत्रकारिता क्षेत्रात बदल घडत आहे.
टीव्ही माध्यम, वृत्तपत्रे हे लोकशाहीचा चौथा स्तंभ स्तंभ असून सामाजिक जागृती निर्माण व जबाबदारी जपण्याचं कार्य करावे असे सांगितले.
हाशीमपीर दर्गाचे सज्यादे नशीन डॉ. सय्यद मुर्ताजा हुसेनी हाश्मी यांच्या सान्निध्यात झालेल्या या कार्यक्रमाचा व्यासपीठावर आमदार विळ्ळल कटकदोंड, आमदार राजूगौडा पाटील, जिल्हाधिकारी टी. भोबालन, जिल्हा पोलिस अधीक्षक डी आनंदकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी राहुल शिंदे, कन्नड व सांस्कृतिक खात्याचे सहायक निर्देशक बी. नागराज, जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संगमेश चुरी, मुख्य सचिव मोहन कुलकर्णी, पदाधिकारी डी बी.वडवडगी, इंदुशेखर मनूर, प्रकाश बेन्नूर, फिरोज रोजीनदार, अविनाश बिदरी, महेश शटगार, के.के.कुलकर्णी, व इतर मान्यवर उपस्थित होते. शेवटी श्रीमती कौशल्या पन्हाळकर यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta