बेंगळुरू : कृषी मंत्री चालुवरायस्वामी यांच्यावर लाचखोरीचा आरोप करत ७ सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
कृषी मंत्री चालुवरायस्वामी यांच्यावर कृषी अधिकाऱ्यांनी 6 ते 8 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असून लाचखोरीला आळा घातला नाही तर विष प्राशन करून आत्महत्या करू, असे या अधिकाऱ्यांनी पत्रात नमूद केले आहे.
नागमंगल, मद्दूर, मंड्या, श्रीरंगपट्टना यांच्यासह 7 सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांनी कृषीमंत्र्यांविरोधात राज्यपालांकडे तक्रार केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta