बेंगळुरू : राजधानी बेंगळुरूमध्ये अलीकडेच पाच संशयित दहशतवाद्यांना सीसीबी पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा एक भाग म्हणून पोलिसांनी आता संशयित अतिरेकी जुनैदच्या साथीदाराला बेंगळुरूमध्ये अटक केली आहे.
आरटी नगर पोलिसांनी राज्यात विघातक कारवाई रचल्याप्रकरणी ए2 आरोपी असलेला संशयित अतिरेकी जुनैदचा सहकाऱ्याला अटक केली आहे.
मोहम्मद अर्शद खान असे अटक आरोपीचे नाव आहे. 2017 मध्ये नूर अहमदचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी तो आरोपी असून चार वर्षांपासून तो बेपत्ता होता. तसेच त्याच्यावर 17 गुन्हे दाखल आहेत.
आरोपींना पकडण्यासाठी आरटी नगर पीएसआय विनोद नाईक यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. अर्शद आरटी नगर येथील एका घरात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पहाटे पाच वाजता घरावर छापा टाकून त्याला अटक केली.
संशयित दहशतवादी जुनैद परदेशात लपून बसला असून तो पाच संशयितांना ग्रेनेड पाठवत होता. सीसीबी पोलिसांनी आरोपी जुनैदला लुक आऊट नोटीस जारी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta