Thursday , December 11 2025
Breaking News

भाजप-धजद युतीला पक्षांतर्गत वाढता विरोध

Spread the love

 

दोन्ही पक्षांना दूरगामी परिणामाची भिती

बंगळूर : भिन्न विचारसरणीचे दोन पक्ष असलेल्या भाजप- धजद यांच्यातील युतीला विरोध पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात तीव्र विरोध होत आहे. काही आमदार उघडपणे विरोध करत आहेत, तर काही पक्षांतर्गत मतभेद नोंदवत आहेत. सुरुवातीच्या टप्प्यावर हे मतभेद निर्माण झाल्याने युतीबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी दोन्ही पक्षांमध्ये दरी निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. .
भाजप आणि धजद यांच्यातील युतीला भाजप आणि धजदच्या काही आमदारांचा विरोध होत आहे. धजदच्या आमदार करेम्मा नाईक यांनी या आघाडीला विरोध दर्शवला आहे. या विरोधामागे भाजप नेत्यांशी स्थानिक मतभेद हे प्रमुख कारण आहे.
देवदुर्गा मतदारसंघातील भाजप नेते आणि कार्यकर्त्यांवर नाराजी व्यक्त करणाऱ्या आमदारानी त्यांना सतत त्रास दिल्याचा आरोप केला. स्थानिक भाजप नेत्यांशी भांडण झाल्याने युतीच्या निर्णयाने त्यांची कोंडी झाली आहे. याशिवाय मतदारसंघातील अल्पसंख्याक समाजाच्या मतांचाही त्यांच्या विजयात महत्त्वाचा वाटा आहे.

एस. टी. सोमशेखरांचा विरोध
विशेषत: माजी मंत्री एस. टी. सोमशेखर यांनी या युतीला वैयक्तिक विरोध नोंदवला आहे. मी मतदारसंघात धजदविरोधात राजकीय संघर्ष केला आहे. अशा परिस्थितीत दोन्ही पक्षांमधील युतीच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले.

स्थानिक पातळीवर समस्या
काँग्रेस आणि धजद आघाडीच्या बाबतीत केवळ नेत्यांमध्ये मतभेद नव्हते. काही भागात तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र मतभेद होते. नेते एकत्र असले तरी कार्यकर्त्यांची एकजूट होणे कठीण आहे, असा एक मतप्रवाह आहे.
आता भाजप आणि धजद युतीला हीच समस्या भेडसावत आहे. आघाडीसाठी सर्वोच्च पातळीवरील नेत्यांनी सहमती दर्शवली आहे व तडजोडीतून सत्ता वाटून घेण्याचा सल्ला दिला. मात्र तळागाळात पक्षहितासाठी एकमेकांबद्दल वैमनस्य वाटणारे कार्यकर्ते युतीला विरोध करत आहेत. त्याला दुरुस्त करणे सोपे जाणार नाही, असे मत दोन्ही पक्षांचे आमदार व्यक्त करत आहेत. त्यामुळे भाजप आणि धजद यांच्यातील युतीमुळे तळागाळात अडचणी निर्माण होणार आहेत.
धजदचे आणखी एक आमदार शारंगौडा कंदकूर यांनीही या आघाडीला विरोध दर्शवला आहे. मतदारसंघातील अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित करत त्यांनी युतीला विरोध केला. मैदानात युती झाली की आपल्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न येतो. हा प्रश्न आम्हा सर्व नेत्यांना सतावत असल्याची नाराजी त्यांनी उघडपणे व्यक्त केली.
धजदची ही गोष्ट असेल, तर भाजपचे नेतेही युतीबाबत नाराज आहेत. काही प्रमुख नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली नाही, तर काहींनी उघडपणे आपला विरोध नोंदवला आहे.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *