Wednesday , March 4 2026
Breaking News

बंगळूर येथील बस डेपोत २० खासगी बसेस जळून खाक

Spread the love

 

बंगळूर : बंगळूरमधील वीरभद्रनगर येथील बस डेपोमध्ये पार्क केलेल्या २० खासगी बसेसना मोठी आग लागली. ही घटना आज (दि.३०) दुपारी एकच्या सुमारास घडली.

बंगळूरमधील वीरभद्र नगरमधील गॅरेजजवळील बस डेपोला लागलेल्या आगीत उभ्या असलेल्या सुमारे २० खासगी बसेस जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. एएनआय या वृत्तसंस्थेने या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये डेपोतून काळ्या धुराचे ढग उठताना दिसत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *