कलबुर्गी : केएई परीक्षा घोटाळ्याप्रकरणी आरोपी आर. डी. पाटील यांना एका अपार्टमेंटमध्ये आश्रय देणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
अपार्टमेंटचे मालक शहापूर येथील शंकरगौडा यळवार आणि व्यवस्थापक दिलीप पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली आहे.
आर. डी. पाटील हा एका मोठ्या गुन्ह्यात आरोपी असून तो पोलिसांना हवा होता. त्याला आश्रय देण्याआधी त्याचे पूर्ववृत्त माहित असावेत, असा युक्तिवाद पोलिसांनी केला. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अपार्टमेंट मॅनेजर दिलीप पवार याने आरोपी पाटील यांच्याकडून 10 हजार रुपये घेतले. पोलिसांनी आगाऊ रक्कम घेऊन शंकरगौडा यांना दिल्याचे सांगितले.
केईए पपरीक्षा घोटाळ्यातील आरोपी आर. डी. पाटील यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली तेव्हा तो याच अपार्टमेंटमध्ये राहत होता. 5 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजता तो महालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये पोहोचला आणि रात्रभर तेथे लपून बसला. दुसऱ्या दिवशी दुपारी त्याला अटक करण्यासाठी पोलीस कारवाई करत असल्याची माहिती मिळताच त्याने कंपाउंडच्या भिंतीवरून उडी मारून पलायन केले. इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याने हे फुटेज कैद केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta