Saturday , June 6 2026
Breaking News

सीमाभागातील विविध समस्यांबाबत समिती शिष्टमंडळाने घेतली शरद पवार यांची भेट

Spread the love

 

बेळगाव : सीमाभागातील मराठी शाळांबाबत तसेच विविध समस्यांबाबत चंद्रकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद यांची पुणे मुक्कामी मोदी बाग येथे भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली.

कंग्राळी बी. के. येथील मराठी शाळेचा प्रश्न शरद पवार यांच्या पुढे मांडण्यात आला. त्यावेळी अमित देसाई यांनी मराठी शाळेचा प्रश्न व विधानसभा निवडणुकीतील पराभवांच्या कारणासंबंधी सविस्तर चर्चा केली. पवार साहेबांनी या सर्व प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.

चंद्रकांत कोंडुसकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी सविस्तर चर्चा करून बेळगाव येथील शेतकऱ्यांच्या स्थिती परिस्थिती विषयी सविस्तर माहिती दिली. मराठी माणूस आणि त्यांच्या समस्या हाच चर्चेचा केंद्रबिंदू होता. खासदार शरद पवार यांनी सीमावर्ती भागातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

बेळगावच्या शिष्टमंडळाने बेळगावच्या अनेक विषयांवर चर्चा केली, त्यावेळी पवार यांनी सध्या बेळगावात सुरू असलेल्या घडामोडी विषयी व विधानसभा लोकसभा निवडणुकाबाबत माहिती जाणून घेतली. सीमाभागातील प्राथमिक मराठी शाळांच्या समस्या देखील पवार यांच्यापुढे मांडण्यात आला.

यावेळी चंद्रकांत कोंडुसकर, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी इंजिनिअर सेलचे अध्यक्ष अमित देसाई, श्रीधर अळवणी, मयूर बसरिकट्टी, शंकर कोणेरी, राजू मनोळकर, पुण्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिनेश जगताप आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सोन्या-चांदीचे १८ लाखांचे दागिने जप्त; घरफोडी प्रकरणी संशयित अटकेत

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर आणि तालुक्यातील विविध भागांत घरफोडी व चोरीच्या घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *