डॉक्टरांसह पाच जणांना अटक; उत्तर कर्नाटकातील महिलांना गर्भपात करण्यास केले प्रवृत्त
बंगळूर : भ्रूण लिंग शोध आणि हत्येवर बंदी असतानाही, बंगळुर पोलिसांनी दोन डॉक्टरांसह पाच आरोपींना अटक केली आहे. त्यांनी म्हैसूर आणि मंड्या भागात गर्भपाताचे मोठे नेटवर्क पकडले आहे. आरोपींच्या चौकशीतून दोन वर्षांच्या कालावधीत सुमारे ९०० भ्रूण हत्या केल्याची त्यांनी कबुली दिली आहे.
डॉ. तुलसी राम, डॉ. चंदन बल्लाळ, मीना, रिझमा आणि निसार अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
गेल्या ऑक्टोबरमध्ये चार आरोपींना गरोदर महिलांना मंड्याला घेऊन जात असताना पोलिसांनी अटक केली होती. खटल्यादरम्यान भ्रूण हत्येचे प्रकरण समोर आले.
आरोपी केवळ बंगळुरूच नव्हे तर शेजारील जिल्हे आणि उत्तर कर्नाटकातील काही भागांतील महिलांना ओळखून त्यांना गर्भपातासाठी बोलावत होते. काही जण भ्रूण तपासणीसाठीही येत होते. त्यानंतर ते स्त्री भ्रूणची हत्या करायचे. त्यासाठी त्याना ठराविक रक्कम मिळायची.
हा उपक्रम ते म्हैसूरच्या माता हॉस्पिटलमध्येच नाही तर मंड्याच्या काही भागातही करत असे. मंड्याच्या एका भिक्षागृहात स्कॅनिंग मशीन ठेवण्यात आली होती. हे अनेक वर्षांपासून सुरू होते. अधिका-यांनी सांगितले की, बैयप्पनहळ्ळी पोलिसांनी वीरेशला अटक केल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
त्यापैकी एकाला अटक करून चौकशी केली असता, दोन वर्षांच्या कालावधीत सुमारे ९०० भ्रूण हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली. कर्मचार्यांच्या अटकेची माहिती मिळताच डॉ. चंदन बल्लाळ लपून होते. त्यांच्या अटकेसाठी सापळा रचण्यात आला. चंदनला शनिवारी अटक करून चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडून अचूक माहिती मिळणे अपेक्षित असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
माता हॉस्पिटलमधील आयुर्वेदिक गोळ्या डे केअर, उदयगिरी, म्हैसूर येथील डॉ. राजकुमार हॉस्पिटल आदी ठिकाणी याआधीच जप्त करण्यात आल्या आहेत.
हे जाळे केवळ बंगळुर, मंड्या, रामनगरपर्यंतच नाही तर इतर ठिकाणीही पसरले असल्याचा संशय आहे. त्यांची चौकशी केल्यास आणखी लोकांना अटक होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोपी गेल्या दोन वर्षांपासून हे बेकायदेशीर कृत्य करत असून म्हैसूर येथील माता रुग्णालयात दर महिन्याला २२ ते २५ पर्यंत गर्भपात करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांचा कठोर कारवाईचा इशारा
भ्रूणहत्या प्रकरणाबाबत बैठक घेऊन कठोर कारवाई करण्यात येईल. ज्यांनी चूक केली असेल त्यांच्यावर कडक कारवाई करू, असा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी इशारा दिला.
स्त्री भ्रूण हत्या आणि गर्भाचे लिंग निश्चित केल्याच्या आरोपाखाली म्हैसूर येथील एका डॉक्टरला पोलिसांनी पाचजणाना अटक केली आहे. ही बाब शासन गांभीर्याने घेऊन आरोग्य विभागासह संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.