Monday , September 21 2026
Breaking News

भारतीय संविधान मनुष्य जीवनाला सुंदर बनवते : प्रा. जे. बी. अंची

Spread the love

 

बेळगाव : येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग आणि एन.एस.एस. घटक यांच्या संयुक्त आश्रयात ‘भारतीय संविधान दिवस’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खानापूर मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या हिंदी विभाग अध्यक्षा प्रा. जे. बी. अंची या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. जे. मोळराखी होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ प्रा. अर्चना भोसले यांच्या स्वागत गीताने झाला. राज्यशास्त्र विषयाच्या विभागध्यक्षा प्रा. एस. आर. नाडगौडा यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडून उपस्थितांचे स्वागत केले. आंबेडकरांच्या फोटो पूजना नंतर ग्रंथपाल सुरेखा कामुले यांनी सर्वांना संविधानांची शपथ दिली. प्रमुख अतिथी या नात्याने बोलताना प्रा. जे. बी. अंची म्हणाल्या की, भारतीय संविधान जगाच्या अन्य संविधानांच्या तुलनेत सर्वांग सुंदर असे आहे . संविधानात लिहिलेले तत्वे मनुष्य आपल्या जीवनात आचरणात आणले तर मनुष्य जीवन सुंदर बनून जाते.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. एच. जे. मोळराखी म्हणाले की, सर्व धर्म समभावनेचे आमचे संविधान आहे. संविधानामुळेच भारतीय समाजात असलेली मानवता जगासमोर जिवंत आहे. आपले दिननित्य जीवन संविधानाच्या तत्त्वानुसार चालले पाहिजे. कार्यक्रमाच्या शेवटी एन.एस.एस. अधिकारी प्रा. राजू हट्टी सर्वांचे आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भाग्यश्री चौगले यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *