Thursday , April 23 2026
Breaking News

भाजप नगरसेवक अभिजीत जवळकर यांना अटक

Spread the love

 

बेळगाव : अखेर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्या आंदोलनाला यश आले असून प्रभाग क्रमांक 42 चे भाजप नगरसेवक अभिजीत जवळकर यांना रविवारी रात्री अटक करण्यात आली असून त्यांची कारागृहात परवानगी करण्यात आली आहे.
भाग्यनगर येथे घरावर मोबाईल टॉवर बसवण्याच्या वादातून गुरुवारी नगरसेवक अभिजीत जवळकर आणि स्थानिक रहिवाशी रमेश पाटील यांच्यात वादावादी झाली व त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. या घटनेनंतर मारामारी करणाऱ्यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी भाजप नगरसेवकांनी टिळकवाडी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले होते. मारहाणी प्रकरणी पोलिसांनी भाग्यनगर येथील रमेश पाटील व त्यांच्या दोन साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांची कारागृहात रवानगी केली होती व नगरसेवक अभिजीत जवळकर हे या मारामारीत जखमी झाल्यामुळे इस्पितळात उपचार घेत होते.

रमेश पाटील यांच्या विरोधात आयपीसी 506, 394, 307, 504, 147, 143, 148 अन्वये टिळकवाडी पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
रविवारी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी समिती नेते रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस सानकांसमोर आंदोलन केले होते. त्यानंतर पोलिसांनी नगरसेवक अभिजीत जवळकर यांना अटक करून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

स्वतःला वकील असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीची सामाजिक कार्यकर्त्यांची मदत

Spread the love  बेळगाव : बेळगाव न्यायालय परिसरात स्वतःला वकील असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीची गंभीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *