हुबळी : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील हुबळी नजीक दोन कार आणि लॉरी यांच्यात भीषण अपघात झाला असून त्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.याबाबत समजलेली माहिती अशी की, एक कार हासनहून गोव्याला जात होती. तर दुसरी कार बेंगळुरूहून शिर्डीला जात होती. या दोन कारमध्ये अपघात झाला आणि नंतर त्यातील एक कार एका लॉरीला धडकली, असे सांगण्यात येत आहे. या झालेल्या अपघातात हासन येथील मणिकंठ (26), पवन (23), चंदन (31) तसेच बेंगळुरू येथील प्रभू (34) अशी मृतांची नावे आहेत.या घटनेत आणखी चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना हुबळी किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुंदगोळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.