Saturday , December 21 2024
Breaking News

भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांचे वादग्रस्त वक्तव्य

Spread the love

बेंगळूर : भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांच्या धर्मांतराच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. मात्र, नंतर त्यांनी आपले विधान बिनशर्त मागे घेतले आहे. कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचे खासदार तेजस्वी सूर्य यांनी उडुपी येथील एका कार्यक्रमात केलेले वक्तव्य मागे घेतले आहे. ज्यामध्ये सूर्या यांनी ज्यांनी हिंदू धर्म सोडला त्या सर्वांची घरवापसी झाली पाहिजे आणि प्रत्येक मंदिर आणि मठाने हिंदूंची घरवापसी हेच लक्ष्य निश्चित केले पाहिजे, असे म्हटले होते.
दोन दिवसांपूर्वी उडुपी श्री कृष्ण मठ येथे झालेल्या एका कार्यक्रमात मी ‘भारतातील हिंदूंची घरवापसी’ या विषयावर बोललो होतो. माझ्या भाषणातील काही विधानांमुळे खेदजनकपणे वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे मी ते विधान बिनशर्त मागे घेत आहे, असे सूर्या आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
कर्नाटकचे खासदार आणि भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी शनिवारी उडुपीच्या श्रीकृष्ण मठ येथे आयोजित एका कार्यक्रमात सांगितले की ज्यांनी हिंदू धर्म सोडला त्या सर्वांची घरवापसी झाली पाहिजे आणि प्रत्येक मंदिर आणि मठाने हिंदूंची घरवापसी हेच लक्ष्य निश्चित केले पाहिजे. हिंदूंसमोर फक्त एकच पर्याय उरला आहे तो म्हणजे हिंदू धर्म सोडून इतर धर्मात गेलेल्या सर्व लोकांची घरवापसी करणे. हे आपोआप नैसर्गिकरित्या होणं शक्य नाही. त्यामुळे आपण पुढाकार घेणं आवश्यक आहे. दुसर्‍या धर्मात गेलेल्या सर्वांना परत आणायलाचं हवं, असं तेजस्वी सूर्या म्हणाले होते. या कार्यक्रमात आपल्या भाषणादरम्यान सूर्या यांनी असेही सांगितले की मठ आणि मंदिरांना वार्षिक लक्ष्य दिले पाहिजे जेणेकरून हिंदू धर्म सोडणारे सर्व पुन्हा आपल्या धर्मात येऊ शकतील. केवळ मुस्लिम किंवा ख्रिश्चनांचे पुन्हा धर्मांतर करून चालणार नाही, तर आजच्या पाकिस्तानातील मुस्लिमांचे हिंदू धर्मात धर्मांतर करणे हे आपले प्राधान्य असले पाहिजे. जेव्हा असे होईल तेव्हा पाकिस्तान आपल्या भारतात परत येईल, असे सूर्या यांनी म्हटले होते.

About Belgaum Varta

Check Also

अभियंता अतुल आत्महत्या प्रकरणी तिघाना अटक

Spread the love  पत्नी, तिची आई, भावाचा समावेश; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी बंगळूर : देशभरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *