

बेंगळुरू : कन्नड चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक द्वारकेश यांचे आज निधन झाले. द्वारकेश ८१ वर्षांचे होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला.
१९ ऑगस्ट १९४२ रोजी म्हैसूर जिल्ह्यातील हुन्सूर येथे जन्मलेले द्वारकेश हे वेगवेगळ्या भूमिकेतून घराघरात पोहचले होते. त्यांना आजाराने ग्रासले होते. द्वारकेश यांचे मंगळवारी (१६ एप्रिल) बंगळुरू येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta