Monday , December 23 2024
Breaking News

राहूल गांधी आज शिमोगा, रायचूर प्रचार दौऱ्यावर

Spread the love

 

 

बंगळूर : काँग्रेस उमेदवार गीता शिवराजकुमार यांच्या प्रचारासाठी पक्षाचे सुप्रीमो राहुल गांधी उद्या (ता. २) शिमोगा येथे येणार आहेत, असे शिमोगा जिल्ह्याचे पालकमंत्री मधु बंगारप्पा यांनी सांगितले.
बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला यांच्यासह महत्त्वाचे नेते प्रचारसभेत सहभागी होणार आहेत. गुरुवारी सकाळी ११ वाजता कार्यक्रम सुरू होईल आणि राहुल गांधी दुपारी १२ वाजता येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
या मेळाव्यात बैंदूरसह शिमोगा जिल्ह्यातील चन्नागिरी, होन्नाळी येथील लोकही मेळाव्यात सहभागी होणार असून एक लाखांहून अधिक लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. शिमोगा जिल्ह्याचे पालक मंत्री मधु बंगारप्पा यांनी सांगितले की, गीता शिवराज कुमार येत्या काही दिवसांत शिकारीपुर, शिरालकोप्पा, अनवट्टी येथे रोड शो करणार आहेत.

रायचूरमध्येही मेळावा
लोकसभा निवडणुकीसाठी उद्या रायचूर शहरातील वाळकट मैदानावर जिल्हा काँग्रेसच्या वतीने प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते, असे लघु पाटबंधारे मंत्री एन. एस. बोसराजू म्हणाले.
ते म्हणाले की, रायचूर लोकसभा मतदारसंघ हा अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ असून, जिल्ह्यात पहिल्यांदाच सेवानिवृत्त आयएएस अधिकारी निवडणुकीला उभे राहिल्याने सर्वांनी एकजूट दाखवली पाहिजे. एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष राहुल गांधी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह अनेक नेते उपस्थित रहातील, असे ते म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

अभियंता अतुलकडून निकीता मागत होती 80 हजार रुपये मेंटेनन्स

Spread the love  बेंगळुरू : अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांची पत्नी निकिता सिंघानिया हिच्यासह …

One comment

  1. sangeeta Ajarekar

    🙏 । माझ्या देश बांधवांनो ।

    मला आज आपणास आशी जाणीव करून ध्यावीशी वाटते कि, जर देशाच्या तमाम योजना या केवळ आणि केवळ, रस्त्यावरील जीवनाच्या प्राथमिक गरजांना तडफणार्या गरिबांसाठी आहेत तर तो गरीब रस्त्यावर भी मागतांना दिसतोच कसा?
    हे वास्तव खरोखर प्रत्येक सहृदय माणसाला जीवधारी लागणारा मुद्दा आहे.
    आस माझं स्पष्ट मत 🙏 आहे.
    वंदेमातरम ।
    जय हिंद, जय जनता-जनार्दन।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *