हुबळी : काँग्रेसने व्होट बँकेसाठी लोकांना त्रास देण्याचे काम केले आहे. बॉम्बस्फोटाची पण त्यांना पर्वा नाही. प्रल्हाद जोशी यांना मिळालेले एक मत मोदीना पुन्हा पंतप्रधान बनवेल. मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर दहशतवादाचा संपूर्ण समूळ नायनाट होईल, असे केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले.
हुबळी येथील विजय संकल्प परिषदेत बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस व्होट बँकेमुळे राम प्राणप्रतिष्ठेला आली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत काँग्रेसचे तुष्टीकरणाचे राजकारण मोडून काढले आहे. तुम्ही प्रल्हाद जोशींना दिल्लीला पाठवा आम्ही त्यांना महान करू. हुबळी-धारवाडच्या विकासाचा प्रश्न येतो तेव्हा जोशी माझ्याशी भांडतात. दुष्काळाबाबत मुख्यमंत्री राजकारण करीत आहेत.
ते म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकमेकांशी भांडत आहेत. आचारसंहिता लागू झाल्यामुळे दुष्काळ निवारणाला विलंब झाला आहे. काँग्रेस खोटे बोलत आहे आणि भाजपवर आरोप करत आहे. पण आता प्रज्वल रेवण्णाची सीडी समोर आली आहे. मी आज स्पष्ट करीन. कोणत्याही महिलेवर अन्याय झाला तरी भाजप त्यांच्यासोबत नाही. सिद्धरामय्या, डीके शिवकुमार इथे ऐका. तुम्ही कारवाई करायला हवी होती. ओक्कलिगा पट्ट्यात निवडणुकीपर्यंत तुम्ही कोणतीही कारवाई केली नाही. तुम्ही राजकारण केले, आरोपींना परदेशात जाऊ दिले.
हिम्मत असेल तर सत्य लोकांसमोर सांगा. असे कृत्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी आणि त्यात विलंब होता कामा नये, अशी आमची भूमिका आहे. एवढा भयंकर गुन्हा असतानाही आपण राजकारण करत आहात असे ते म्हणाले.
नेहा हिरेमठ हिची 18 एप्रिल रोजी हत्या झाली होती. ते वैयक्तिक असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले. जर तुम्ही करू शकत नसाल तर आम्ही कर्नाटक सुरक्षित करू. कर्नाटकातील मुलींना आम्ही सुरक्षा देऊ, असे ते म्हणाले.