पंतप्रधानाना महिलांची माफी मागण्याचे आवाहन
बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हासन खासदार आणि धजदचे उमेदवार प्रज्वल रेवण्णा हे ‘सामुहिक बलात्कारी’ असल्याचे माहीत असूनही त्यांचा प्रचार केला, असा आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींनी देशातील महिलांची माफी मागावी, अशी मागणी केली.
गुरुवारी शिमोगा शहरातील निवडणूक प्रचार सभेत बोलताना त्यांनी आरोप केला की, देशातील सर्व विभागांवर नियंत्रण असूनही मोदींनी प्रज्वल रेवण्णा यांना जर्मनीला जाण्यासाठी मदत केली. हे सेक्स स्कँडल नसून सामूहिक बलात्काराचे प्रकरण आहे. प्रज्वलने ४०० महिलांवर बलात्कार केला होता आणि मोदींनी हसनमध्ये त्यांच्यासाठी प्रचार केला हे लज्जास्पद आहे”, अशी काँग्रेस नेत्याने टीका केली.
भाजप ‘सामुहिक बलात्कार करणाऱ्याला ढाल करत आहे’ आणि हीच मोदींची हमी आहे, असा आरोप करून काँग्रेस त्यांच्यावर कारवाई करेल, अशी त्यांनी ग्वाही दिली.
माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा यांना भारतातून पळून जाण्यास मदत केल्याचा आरोपही त्यांनी पंतप्रधानांवर केला. पंतप्रधान मोदींनी त्यांना जर्मनीला जाण्यापासून रोखले नाही. त्यांच्याकडे सर्व यंत्रणा आहे, तरीही त्यांनी सामूहिक बलात्कार करणाऱ्याला जर्मनीला जाऊ दिले, ही ‘मोदींची हमी’ आहे. भ्रष्ट नेता असो वा सामूहिक बलात्कार, भाजप त्याना संरक्षण देईल, असा आरोप त्यांनी केला.
सामूहिक बलात्कार करणाऱ्याच्या बाजूने मतांची भीक मागणाऱ्या पंतप्रधानांनी जगभरात हा चर्चेचा विषय बनवला आहे. ही भाजपची विचारधारा आहे. युती करायला आणि सत्तेसाठी काहीही करायला ते तयार आहेत, असा आरोप राहुल गांधींनी केला.
संविधान बदलण्याचा घाट
भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भारतीय संविधानावर केलेल्या टीकेचा संदर्भ देत राहुल म्हणाले, “नड्डा यांच्या मते, जे समानता शोधतात ते माओवादी आहेत. भाजप अध्यक्षांनी संविधानाचा अनादर केला आहे. पण मोदी म्हणतात की त्यांना संविधानाचे रक्षण करायचे आहे. जर ते खरे असेल तर ते संविधानावर का हल्ला करत आहेत? संविधान बदलले तर दलित, ओबीसी त्यांच्या जमिनी, संपत्ती गमावतील, असेही ते म्हणाले.
“आज जर मागासवर्गीय लोकांना राजकीय सत्ता मिळत असेल तर ती भारतीय संविधानामुळे आहे. भाजपला एससी, एसटीचे आरक्षण नको आहे आणि ते रद्द करायचे आहे. पण काँग्रेसने नेहमीच संविधानाचे रक्षण केले आहे”, असे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचे आवाहन करताना राहुल म्हणाले की, पक्ष देशातील गरीब कुटुंबातील महिलांना एक लाख रुपयांसह नवीन पाच हमींची अंमलबजावणी करेल.
आता तुम्ही , देशप्रेमी नेता आशा आस्तीनमधील सापांना कसे ओळखणार आशी माणसे सर्वच ठिकाणी असतात, अगदि स्वर्गात सुद्धा तेथे हि ईव्हन राज्यकर्त्यांच्या मंत्री मंडळात देखील ,” फितूर ” मंत्र्याचा राजाशी विश्वास घाताच्या साक्शी ची कितीतरी उदाहरणे इतीहासात पहायला मिळतात. ।
वंदेमातरम।