चिक्कोडी : पत्नीच्या मृत्यूचा मानसिक धक्का बसल्याने पती आणि दोन तरुण मुलींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना चिकोडी तालुक्यातील पोगत्यानट्टीमध्ये घडली आहे.
या संबंधी मिळालेली माहिती अशी कि, बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील पोगत्यानट्टी गावातील चन्नव्वा रंगापुरे (वय ४०) या महिलेचे गेल्या आठवड्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. हा धक्का सहन न झाल्याने आज चन्नवाचा पती काडाप्पा (वय ४७), मुली कीर्ती (वय २०) तसेच कीर्ती (वय १८) या तिघांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने पोगत्यानट्टी गावात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी चिकोडी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. चिकोडी पोलीस स्थानाच्या व्याप्तीत ही घटना घडली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.