Sunday , September 8 2024
Breaking News

बोरगाव महिला अर्बनला 7 लाखाचा नफा

Spread the love

संस्थापिका सुनिता अण्णासाहेब हवले : 20 वी वार्षिक सभा
निपाणी : माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हवले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या बोरगाव महिला अर्बन ऑप. क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून अनेक महिलांना आर्थिक व्यवहाराचे सवय होत आहे. बचतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महिला अर्बन पत संस्थेमुळेच महिलांना आर्थिक व्यवहाराचे ज्ञान होत असल्याचे मत संस्थेच्या संस्थापिका सुनीता आण्णासाहेब हवले यांनी व्यक्त केले. संस्थेच्या 20 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ रुपाली आडमुठे होत्या. सुनिता हवले म्हणाल्या, बोरगावसारख्या ग्रामीण भागात महिला एकवटल्या पाहिजेत. त्यांना आर्थिक बचतीची सवय लागली पाहिजे. शिवाय अनेकांच्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात या उद्देशाने संस्थेचे मार्गदर्शक अण्णासाहेब हवले यांच्या पुढाकाराने या संस्थेची स्थापना केली आहे. संस्थेमार्फत अनेक कुटुंबियांना आर्थिक सहकार्य संस्थेमार्फत करत आहोत. संस्थेचे 681 सभासद, भाग भांडवल 20 लाख 21 हजार, गुंतवणूक 1 कोटी 64 लाख 30 हजार, संस्थेच्या 2कोटी 67 लाख 74 हजार ठेवी, 1 कोटी 61 लाख 70 हजार कर्ज वितरण करून 7 लाख 6 हजार रुपये इतका निव्वळ नफा मिळवला असल्याचे सांगितले. संस्थेच्या प्रधान व्यवस्थापिका रेखा कुन्नूरे यांनी ताळेबंद मांडला. त्याला सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली. प्रा. रूपाली आडमुठे म्हणाल्या, महिलांनी चूल, मूल यासारख्या बंधनात न राहता सामाजिक क्षेत्रात वावरावे. संसाराचा गाडा ओढताना थोडीफार बचत करावी. या बचतीला एक विश्वसनीय संस्था मिळावी, या उद्देशानेच या संस्थेची उभारणी झाली असल्याचे सांगितले. प्रारंभी प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन प्रमुख पाहुण्या सीमा माळी यांच्यासह अन्य महिलांच्या हस्ते झाले. संस्थेमार्फत उपस्थित महिला मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष सीमा माळी, रोहिनी बसनवर, अलका पाटील, माणिक फिरगनवर, सुविता मैशाळे, जयश्री पाटील, पद्मश्री तेरदाळे, लता पाटील, सुनंदा हवले, हौसाबाई माळगे, हलिमा मुजावर, लक्ष्मीबाई शिंगे, चंद्राबाई ऐदमाळे, भारती पाटील, सुधा झावरे, राजश्री चिप्रे, शेवंती कमते यांच्यासह महिला सभासद व कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री मराठा सौहार्द सहकारी संघाचे निपाणीत उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार काकासाहेब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *