धजद आता फुटीच्या मार्गावर; आमदारही संपर्कात असल्याचा दावा बंगळूर : धर्म निरपेक्ष जनता दला (धजद)चे सुप्रीमो एच. डी. देवेगौडा यांचा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करण्याचा निर्णय फेटाळत पक्षाच्या कर्नाटक शाखेचे अध्यक्ष सी. एम. इब्राहिम यांनी सोमवारी धजद पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील होणार नसल्याचे सांगितले. पक्षात …
Read More »येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या वतीने हेस्कॉमला निवेदन सादर
बेळगाव : येळ्ळूर ग्रामपंचायतच्या व्याप्तीतील पाणी पुरवठा संदर्भात नाल्याला लागून असलेली धोकादायक स्थितीतील विद्युत वाहिनी रस्त्याच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे, गावातील इतर ठिकाणी जीर्ण झालेले खांब हटवून नविन खांब उभारणी करण्यासंदर्भात तसेच ग्रामदेवता चांगळेश्वर देवी परिसर आवारा शेजारी जिथं एक शाळाही आहे आणि जिथं गावातील यात्रोत्सव आणि इतर …
Read More »चव्हाण वाड्यात संत बाबामहाराज चव्हाण मूर्तीची प्रतिष्ठापना
निपाणी (वार्ता) : येथील हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब दर्गा प्रस्थापक श्री संत बाबा महाराज चव्हाण मूर्तीची प्रतिष्ठापना चव्हाण वाडा समाधी स्थळ येथे करण्यात आली. त्यानिमित्त होमहवन, पूजापाठ, दिंडी सोहळा, बाहेरील समाधीस आरती, दर्गाभेट करण्यात आली. श्रीमंत विश्वासराव विष्णुपंत देसाई सरकार व श्रीमंत राजाका विश्वासराव देसाई सरकार यांच्या प्रेरणेने कल्पना …
Read More »बोरगाव ‘अरिहंत’च्या जयसिंगपूर शाखेचे बुधवारी उद्घाटन
संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील यांची माहिती निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरिहंत को- ऑप. क्रेडिट सोसायटी मल्टीस्टेट संस्थेने ११०४ कोटी ठेवींचा टप्पा पार करून २००० कोटींकडे वाटचाल केली आहे. या संस्थेच्या जयसिंगपूर येथील ५७ व्या शाखेचे उद्घाटन बुधवारी (ता.१८) सकाळी १० वाजता इंगळे बिल्डिंग ७ वी गल्ली गांधी …
Read More »बेळगाव तालुका क्षत्रिय मराठा परिषद पदाधिकारी निवड जाहीर
डी. बी. पाटील अध्यक्षपदी ; उपाध्यक्ष रोहण कदम तर कार्याध्यक्षपदी आर.के. पाटील सचिवपदी रवी पाटील व एस. व्ही. जाधव यांची निवड बेळगाव (वार्ता) : कर्नाटक राज्यातील क्षत्रिय मराठा परिषद व बेळगाव जिल्हा क्षत्रिय मराठा परिषदतर्फे सोमवार दि. 16 ऑक्टोबर रोजी डी.बी.पाटील फोटो स्टुडिओ कार्यालयात बेळगाव तालुका क्षत्रिय परिषदेची नूतन …
Read More »देशात पुढील 48 तास पावसाची शक्यता, केरळला ऑरेंज अलर्ट; महाराष्ट्रातही रिमझिम पाऊस
पुणे : देशासह राज्यातून अद्याप पावसाने पूर्णपणे माघार घेतलेली नाही. राज्यासह देशाच्या काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. पश्चिम भारतात पुढील 48 तास पावसाची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुजरात, राजस्थान या राज्यांमधून मान्सून परतला आहे. केरळला …
Read More »काळ्यादिनाबाबत मध्यवर्ती समितीने घेतली पोलिस आयुक्त आणि उपायुक्तांची भेट
बेळगाव : 1 नोव्हेंबर काळा दिनाच्या पार्श्वभूमीवर सायकलफेरीचा मार्ग आणि काळ्यादिनाबाबत पोलिस आयुक्त आणि उपायुक्तांची मध्यवर्ती म. ए. समिती नेत्यांनी भेट घेऊन निवेदन पत्र दिले. 1956 पासून महाराष्ट्र एकीकरण समिती 1 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारच्या पक्षपाती निर्णयाविरोधात काळादिन पाळत आहे. या दिवशी सकाळी निषेध फेरी निघते आणि त्यानंतर मराठा …
Read More »शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक बुधवारी
बेळगाव : शहर म. ए. समिती बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांची बैठक बुधवार दिनांक 18 आक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजता मराठा मंदिर बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे अध्यक्ष श्री. दीपक दळवी हे कळवितात.
Read More »गांजा विक्रेत्याला अटक; शहापूर पोलिसांची कारवाई
बेळगाव : घरात साठवणूक करून ठेवलेला गांजा जप्त करून एकास अटक केल्याची माहिती शहापूर पोलिसांनी दिली. घरावरील छतावर बेकायदेशिररित्या उगवलेला आणि घरात साठवणूक करून ठेवलेला गांजा जप्त करण्यात आला असून रोहन महादेव पाटील (वय 23) रा. घर क्रमांक 294/1 रामदेव गल्ली सोनार गल्ली ( बोळ) वडगाव असे आरोपीचे नाव …
Read More »काळादिन गांभीर्याने पाळण्यात यावा; खानापूर समितीच्या बैठकीत आवाहन
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची बैठक सोमवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी तीन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी म. ए. समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव बळवंतराव देसाई होते. १ नोव्हेंबर २०२३ रोजी काळादिन गांभीर्याने पाळण्यात यावा यासाठी बहुसंख्येने कार्यकर्त्यांनी हजर रहावे यासाठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta