Monday , September 21 2026
Breaking News

गांजा विक्रेत्याला अटक; शहापूर पोलिसांची कारवाई

Spread the love

 

बेळगाव : घरात साठवणूक करून ठेवलेला गांजा जप्त करून एकास अटक केल्याची माहिती शहापूर पोलिसांनी दिली.
घरावरील छतावर बेकायदेशिररित्या उगवलेला आणि घरात साठवणूक करून ठेवलेला गांजा जप्त करण्यात आला असून रोहन महादेव पाटील (वय 23) रा. घर क्रमांक 294/1 रामदेव गल्ली सोनार गल्ली ( बोळ) वडगाव असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहिती वरून शहापूर पोलीस निरीक्षक एस. एस. सिमानी आदी सहकाऱ्यांनी धाड टाकून ही कारवाई केली आहे.
रोहन महादेव पाटील रहात असलेल्या घरावर पोलिसांनी छापा टाकून घराच्या छतावर उगवलेल्या कच्च्या गांजाची 23 रोपे (1700 ग्रॅम वजनाची) किंमत 45,600/- आणि घरात ठेवलेले 60 ग्रॅम गांजाच्या बिया आणि पाने त्याची किंमत 3,000/ असे दोन्ही मिळून एकूण 48,600/- किमतीचा गांजा जप्त करत त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. शहापूर पोलिसांनी अधिक तपास चालवला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *