Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

न्यू इंग्लिश स्कूल मुतगे शाळेचे विभागीय क्रिडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश

  बेळगाव : बेळगाव मधील प्राथमिक व हायस्कूल पातळीवर विभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यासाठी विविध शाळांचे विभाग पाडण्यात आले असुन बेळगाव ग्रामीण मधील हलगा झोनच्या न्यू इंग्लिश स्कूल, मुतगे शाळेच्या दोन्ही मुला-मुलींच्या थ्रोबॉल संघाने प्रथम व कुस्तीमध्ये आर्यन चौगुले, ऋतिक पाटील, रोशन पाटील, प्रज्योत इंगळे आणि ऋतुजा …

Read More »

दुचाकीवरील चोरट्याकडून महिलेचे दीड तोळे गंठण लंपास

  निपाणीतील घटनेमुळे महिलांमध्ये भीती निपाणी (वार्ता) : शाळा सुटल्यानंतर घरी जाqणाऱ्या शिक्षिकेचे दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी दीड तोळ्याचे गंठण हिसकावून पोबारा केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास निपाणी येथे घडली. मीनाक्षी चंद्रशेखर सनदी (रा. लेटेस्ट कॉलनी, निपाणी) असे या महिलेचे नाव आहे‌. याबाबत घटनास्थळासह पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती …

Read More »

बोरगाव औद्योगिक वसाहतीतील कारखानदारांना सबसिडी द्या

  माजी आमदार काकासाहेब पाटील; वस्त्रोद्योग मंत्री शिवानंद पाटील यांच्याशी चर्चा निपाणी (वार्ता) : कर्नाटकात घरगुती आणि व्यवसायिक वीज बिलात वाढ झाली आहे. त्याचा उद्योजकांना आर्थिक फटका बसत आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन तात्काळ वस्त्रोउद्योग व्यवसायिकांना सबसिडी सुरू करून त्यांना दिलासा द्यावा. याबाबत वस्त्रोद्योग आयुक्तांना सूचना केल्या आहेत. त्यामुळे सीमा …

Read More »

असहाय्य वृद्ध दांपत्याला एफएफसीने दिला दिलासा

  बेळगाव : फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या पुढाकाराने जांबोटी रस्त्यावरील बामणवाडी क्रॉस येथे हलाखीचे जीवन कंठणाऱ्या एका असहाय्य वृद्ध दांपत्याला जीवनावश्यक साहित्याची मदत करून दिलासा देण्यात आला. याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, जांबोटी रस्त्यावरील बामणवाडी क्रॉस येथे एक वृद्ध जोडपं कोणाच्याही आधाराशिवाय एका छोट्या खोलीत हलाखीचे जीवन जगत असल्याची माहिती सागर …

Read More »

कामकुमार नंदी महाराजांच्या हत्येच्या निषेधार्थ खानापूर तहसील कार्यालयावर हिंदू संघटनेचा मोर्चा

  खानापूर : हिरेकुडी (ता.चिकोडी) येथील नंदी पर्वत आश्रमाचे आचार्य कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्येच्या निषेधार्थ गुरूवारी दि. १३ रोजी खानापूर तालुका हिंदु संघटनेच्या वतीने भाजप युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली खानापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. प्रारंभी खानापूर …

Read More »

बरगाव येथील मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारणाऱ्या त्रिकुटापैकी एक ताब्यात

  खानापूर : रात्रीच्या सुमारास मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारणाऱ्या त्रिकुटापैकी एक चोरटा हाती लागला. प्रज्वल प्रकाश वागळेकर (वय 21) रा. बरगाव, तालुका खानापूर असे हाती लागलेल्या संशयीत चोरट्याचे नाव असून हातातून निसटलेली जोडगोळीही बरगावचीच असल्याचे समजते. खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी रोडवरील बरगाव जवळ असलेल्या के. पी. पाटील नगरातील साई मंदिरातील दानपेटी …

Read More »

सौंदत्ती यल्लम्मा मंदिराच्या हुंडीत कोट्यवधी रुपयांची देणगी जमा!

  बेळगाव : राज्यातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती रेणुका यल्लम्मा मंदिराची हुंडी मोजणी पूर्ण झाली असून यावेळी मोठ्या प्रमाणात देणगी जमा झाली आहे. 17 मे ते 30 जून या 45 दिवसांत मंदिरात 1.37 कोटी रुपयांची देणगी जमा झाली. मंदिराच्या हुंडीत 1 कोटी 30 लाख 42 हजार रुपये …

Read More »

बोरगाव अरिहंत दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी शिवाजी तोडकर

  उपाध्यक्षपदी सिकंदर अफराज; दोन्ही निवडी बिनविरोध निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील श्री. अरिहंत दूध उत्पादक सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली.संघाचे अध्यक्षपदी शिवाजी तोडकर व उपाध्यक्षपदी सिकंदर अफराज यांची निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी गजानन लोकरे यांनी केली. संघाचे विद्यमान संचालक युवानेते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली या निवडी करण्यात …

Read More »

भारत-वेस्ट इंडिज कसोटी; पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

  डोमिनिका : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात बुधवारी डोमिनिकामध्ये बुधवारी खेळवण्यात आलेल्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याला काल (बुधवारपासून) सुरुवात झाली. सामन्याचा पहिल्या दिवस पूर्णपणे टीम इंडियाच्या बाजूनं होता. वेस्ट इंडिजनं टॉस जिंकत सर्वात आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 150 धावा करुन ऑल …

Read More »

बेळगावचे नवे प्रादेशिक आयुक्त शेट्टण्णावर एस. बी.

  बेळगाव : हट्टी गोल्ड माईन्स कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शेट्टण्णावर एस. बी. यांची बेळगाव विभागाचे नूतन प्रादेशिक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सध्याचे प्रभारी प्रादेशिक आयुक्त नितेश पाटील यांच्याकडून तात्काळ पदभार स्वीकारण्याचा आदेश त्यांना बजावण्यात आला आहे. तत्कालीन प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांनी 31 मे रोजी …

Read More »