Monday , July 27 2026
Breaking News

Belgaum Varta

जनावरांना चारा वाटपास प्रारंभ

  रयत संघटनेच्या मागणीची दखल; प्रत्येक शेतकऱ्याला २० किलो चारा निपाणी (वार्ता) : निपाणी आणि चिक्कोडी तालुक्यात उन्हाळ्यात चारा आणि पाण्याची टंचाई भासत आहे. याबाबत रयत संघटने तर्फे तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले होते. त्याची दखल घेऊन प्रशासनातर्फे बेळकुड येथून शेतकऱ्यांना चारा देण्यास प्रारंभ करण्यात आला. प्रत्येक शेतकऱ्याला २० …

Read More »

केंद्रात काँग्रेस सत्तेची गरज : पालकमंत्री सतीश जारकीहोळी

  निपाणीत काँग्रेस मेळावा निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दिलेल्या जाहीर नाम्यातील पाचही योजना अंमलात आणल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना आधार लागला आहे. केंद्रात सत्ता आल्यास आणखीन नवनवीन योजना राबवू, असे आश्वासन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता.२९) मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात काँग्रेस पक्षा …

Read More »

संजीवीनी फौंडेशनमध्ये उत्साहात रंगपंचमी साजरी

  बेळगाव : आदर्शनगर वडगाव येथील संजीवीनी फौंडेशन येथे रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. काळजी केंद्रात राहणाऱ्या आबालवृद्धांनी तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी एकमेकांना रंग लावून गाण्याच्या ठेक्यावर नृत्य करत होळीचा आनंद लुटला. काळजी केंद्रात राहणाऱ्या आजीआजोबांना होळीचा मनसोक्त आनंद लुटता यावा यासाठी संस्थेच्या संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ यांनी देखील आजीआजोबांसोबत रंगपंचमीचा …

Read More »

सुप्रिया सुळे, कोल्हे पहिल्या यादीत; नगरमधून निलेश लंके; शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर

  बारामती : शरद पवार गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शरद पवार गटाने पाच जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. बारामतीतून सुप्रिया सुळे आणि शिरूरमधून अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर वर्ध्यातून अमर काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिंडोरीतून भास्कर भगरे यांना तर नगरमधून निलेश लंके …

Read More »

महायुतीच्या उमेदवारासाठी कागलचे कट्टर विरोधक एकत्र!

  मुश्रीफ – घाटगे अन् मंडलिकांची बंद खोलीत चर्चा कोल्हापूर : गेल्या महिन्याभरापासून उमेदवारी मिळणार की नाही या प्रतीक्षेमध्ये असलेल्या कोल्हापुरातील शिंदे गटाच्या दोन्ही खासदारांना पहिल्या यादीमध्ये उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचाराचा मार्ग मोकळा झाला आहे. कोल्हापूरमध्ये महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक हेच आहेत, तर हातकणंगलेमधून धैर्यशील माने उमेदवार असणार …

Read More »

रंगात, रंगली निपाणी

  अबालवृद्धांनी लुटला आनंद निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरात शनिवारी (ता.३०) रंगपंचमीचा जल्लोष पाहायला मिळाला. सकाळी सात पहिल्यापासूनच बालचमू, युवक, तरुणी आणि महिलांनी विविध रंगांची मुक्त हस्ते उधळण केली. तर लहान मुलांनी आकर्षक पिचकान्यांमधून एकमेकांवर रंग उडवून रंगपंचमीच्या आनंद लुटला. शहरातील चौका चौकात संगीताच्या तालावर मनमुरादपणे नृत्य करत होते. …

Read More »

सौंदत्ती येथील श्रीक्षेत्र रेणुका मंदिराला 11.23 कोटींची देणगी

  बेळगाव : सौंदत्ती डोंगरावरील रेणुका देवीच्या देणगीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील वर्षभरात देवीला 11 कोटी 23 लाख रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे. 2022-23 सालच्या तुलनेत दोन कोटी चाळीस लाख रुपयांची वाढ झाली आहे. दुष्काळाच्या छायेतही भाविकांचा उत्साह वाढला असल्याची माहिती मंदिराचे कार्यकारी अधिकारी मंदिराला आलेले देणगीची माहिती देण्यासाठी …

Read More »

४० टक्के कमिशन जाहिरात; सिध्दरामय्या, शिवकुमारना समन्स जारी

  राहूल गांधीना एक जूनपर्यंत सवलत बंगळूर : गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारवर विविध पदांसाठी दर निश्चित केल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसने राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर भ्रष्टाचाराच्या नावाखाली जाहिरात प्रसिद्ध करून या प्रकरणाची बदनामी केली होती. लोकप्रतिनिधींच्या विशेष (दंडाधिकारी) न्यायालयाचे न्यायाधीश जे. प्रीत यांनी काँग्रेसविरोधात भाजपने केलेल्या खासगी …

Read More »

कर्नाटकात २०.८५ कोटी रुपये, २७ कोटींची दारू जप्त

  बंगळूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून, कर्नाटकमध्ये २०.८५ कोटी रुपयांची रोकड आणि २७ कोटी रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे, असे निवडणूक आयोगाने शुक्रवारी सांगितले. कर्नाटकात २६ एप्रिल आणि ७ मे रोजी दोन टप्प्यात २८ मतदारसंघांसाठी लोकसभा निवडणुका होणार आहेत. आतापर्यंत जप्त केलेली एकूण …

Read More »

केकेआरकडून आरसीबीचा ७ गडी राखून पराभव

  बंगळुरू : आयपीएलच्या १७व्या हंगामातील १०वा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाइट रायडर्स आमनेसामने आले होते. या सामन्यात गौतभ गंभीरच्या केकेआरने विराट कोहलीच्या आरसीबीचा ७ विकेट्सनी पराभव केला. त्याचबरोबर यंदाच्या हंगामातील सलग दुसरा विजय नोंदवला. या सामन्यात केकेआरसाठी व्यंकटेश अय्यने (५०) …

Read More »