Monday , March 9 2026
Breaking News

Belgaum Varta

‘पीओपी’ मूर्ती, डॉल्बी लावल्यास थेट गुन्हा!

  मंडल पोलीस निरीक्षक तळवार; कारवाईचा बडगा उगारणार निपाणी (वार्ता) : यंदाचा गणेशोत्सव चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या पार्श्वभूमीवर गावागावांत मूर्तीवर अखेरचा हात फिरविला जात आहे. उत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तीनिर्मितीसह प्रतिष्ठापना करण्यास जिल्हा प्रशासनाने यंदाही पूर्णपणे बंदी घातली आहे. शिवाय डॉल्बीही हद्दपार करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला …

Read More »

जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते कावळेवाडीच्या खेळाडूंचा सन्मान

    बेळगाव : कावळेवाडी गावातील उदयोन्मुख खेळाडू प्रेम बुरुड (सातवी), पैलवान रवळनाथ श्रीधर कणबरकर (नववी) यांनी नुकताच झालेल्या शालेय स्पर्धेत घवघवीत यश संपादन करुन गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. पैलवान रवळनाथ श्रीधर कणबरकर याने जिल्हा स्तरावर कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून त्याची 80 किलो वजन गटात राज्यस्तरीय निवड झाली. …

Read More »

बेळगावच्या राजाचे मोठ्या उत्साहात आगमन

  बेळगाव : यंदा गणेश चतुर्थीला वेगळाच रंग आला आहे. प्रत्येक मंडळातील गणेश मुर्ती किती उंच आणि कोणत्या स्वरूपात असते, तेथील मंडपातील सजावट कशी असते हे पाहायला भाविकांची गर्दी होते. अशीच गर्दी आजही बेळगावातील धर्मवीर संभाजीराजे चौकात गुरुवारी रात्री झाली जेव्हा बेळगावचा राजाचे आगमन शहरात झाले. तेव्हा बेळगावचा राजाची गणेश …

Read More »

श्री मळेकरणी क्रेडिट सौहार्द सहकारी सोसायटीचा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी

  बेळगाव : श्री मळेकरणी क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित उचगाव या सोसायटीच्या वतीने रविवार दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी ठीक सकाळी 11.30 वाजता शंकर-पार्वती मंगल कार्यालय, उचगाव -कोवाड रोड उचगाव येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या महनीय व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती सोसायटीचे संस्थापक चेअरमन श्री. …

Read More »

पायोनियर बँकेला 1 कोटी 55 लाखाचा निव्वळ नफा

  बेळगाव : 117 वर्षाची परंपरा असलेल्या येथील पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला गेल्या आर्थिक वर्षात 2 कोटी 7 लाख 87 हजाराचा ढोबळ नफा झाला असून 1 कोटी 55 लाख 55 हजाराचा निव्वळ नफा झाला आहे, अशी माहिती बँकेचे विद्यमान चेअरमन श्री. प्रदीप अष्टेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. बँकेची 117 वी …

Read More »

तिरुपतीजवळील अपघातात बेळगाव येथील पाच जणांचा मृत्यू

  हैदराबाद : आंध्र प्रदेश येथील केव्हीपल्ली तालुक्यातील मथमपल्ली येथे झालेल्या भीषण वाहन अपघातात तिरुपतीला निघालेल्या पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर 11 जण जखमी झाले असून सर्व रहिवासी बेळगाव जिल्ह्यातील आहेत. बेळगाव जिल्ह्यातील असलेले भाविक क्रूझर वाहनातून तिरुपतीला निघाले होते. थिंपप्पाचे दर्शन घेऊन सर्व जण आपल्या मूळ गावी परतत …

Read More »

मराठा आरक्षण विधेयक संसदेत मंजूर करा; मराठा समाज सुधारणा मंडळाकडून पत्र

  बेळगाव : महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात संसदेत आगामी विशेष अधिवेशनात आरक्षणासंदर्भात विधेयक मंजूर करा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्या ही मागणी मराठा समाज सुधारणा मंडळाने पंतप्रधानांकडे एका पत्राद्वारे केली आहे. महाराष्ट्रातील मराठा समाज हा आर्थिक, सामाजिक तसेच शैक्षणिक दृष्ट्या मागासला असून महाराष्ट्रातील मराठा समाजाकडून शासकीय सेवा आणि …

Read More »

श्रीलंकेची फायनलमध्ये धडक, मेंडिस-असलंकाची धमाकेदार खेळी

  कोलंबो : आशिया चषक 2023 च्या सुपर-4 च्या महत्त्वाच्या सामन्यात श्रीलंकेनं पाकिस्तानचा 2 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीतील आपलं स्थान पक्कं केलं आहे. त्यामुळे आशिया चषक 2023 च्या अंतिम सामन्यात टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये लढत होणार आहे. डीएलएसच्या नियमांनुसार, या सामन्यात श्रीलंकेसमोर 252 धावांचं लक्ष्य होतं, जे त्यांनी …

Read More »

बेळगाव जिल्ह्यातील १३ तालुके दुष्काळग्रस्त

  अधिकृत घोषणा; राज्यातील १९५ तालुके, बेळगाव, खानापूरला वगळले बंगळूर : राज्यातील ३१ जिल्ह्यांतील २३६ तालुक्यांपैकी राज्य सरकारने २०२३ मधील १९५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून अधिकृतपणे घोषित केले आहेत. त्यात बेळगाव जिल्ह्यातील १३ तालुक्यांचा समावेश असून दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून बेळगाव व खानापूर तालुक्याना वगळण्यात आले आहे. मध्यम अवर्षण प्रवण तालुक्यातही त्यांचा …

Read More »

खानापूर तालुक्यातील कांही गावांमध्ये शुक्रवार आणि शनिवारी वीज खंडित

  खानापूर : कर्नाटक विद्युत पारेषण महामंडळाच्या वतीने वीज क्षमता वाढविण्याच्या कामामुळे खानापूर तालुक्यातील बीडी गावातील 110 केव्ही सबस्टेशनद्वारे पुरवठा करण्यात येणाऱ्या भागात शुक्रवार 15 सप्टेंबर व शनिवार 16 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहणार आहे. हिंडलगी, मंगेनकोप्प, केरवाड, बीडी, कक्केरी, चुंचवाड, रामापुर, सुरापुर, गोलिहळ्ळी, …

Read More »