Thursday , December 18 2025
Breaking News

Belgaum Varta

बेळगाव मनपाच्या चारही स्थायी समिती अध्यक्षांची बिनविरोध निवड

    बेळगाव : बेळगाव महानगर पालिकेच्या चारही स्थायी समित्यांच्या अध्यक्षांची निवड आज परंपरेप्रमाणे बिनविरोध पार पडली. बेळगाव महानगर पालिकेच्या सभागृहात आज चारही स्थायी समित्यांच्या अध्यक्षांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी कर आणि महसूल स्थायी समिती अध्यक्षपदी वीणा विजापूरे, सार्वजनिक बांधकाम स्थायी समिती अध्यक्षपदी वाणी विलास जोशी, अकाउंट्स स्थायी समिती …

Read More »

वाळूने भरलेली लॉरी पलटी; सुदैवाने बचावला लॉरी चालक

  चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील चिंचणी गावाजवळ निपाणी-मुधोळ राज्य महामार्गाच्या कडेला उभी असलेली वाळूने भरलेली लॉरी स्वतःहून पलटी होऊन लॉरी चालक सुखरूप बचावला. यरगट्टीहून निप्पाणीकडे वाळूची वाहतूक करणाऱ्या चन्नाप्पा गोविंदप्पागोळ या चालकाने रस्त्याच्या कडेला टिप्पर न्युट्रल करून खाली उतरला होता . अचानक हा टिप्पर महामार्गालगत उलटला. सुदैवाने चालक या वाहनातून …

Read More »

ज्येष्ठ नागरिक संघटनेची 10 जुलै रोजी महत्त्वाची बैठक

  खानापूर : कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटना, उपघटक खानापूर तालुका, यांची महत्त्वाची मासिक बैठक सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता श्री संत ज्ञानेश्वर मंदिर खानापूर येथे बोलाविण्यात आली आहे. तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष व समिती यांनी केले आहे. या बैठकीत …

Read More »

नीलम गोऱ्हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार!

  मुंबई : शिवसेनेच्या रणरागिनी, पीडित महिलांचा आवाज आणि ठाकरे गटाची बाजू अभ्यासू आणि खंबीरपणे मांडणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाला हा मोठा धक्का समजला जातोय. एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड केल्यानंतर अनेक नेते शिवसेनेत दाखल होत आहेत. मात्र त्या …

Read More »

अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित

  काश्मीरमधील मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय नवी दिल्ली : ‘जय बाबा बर्फानी’च्या घोषात 1 जुलैपासून सुरु झालेली पवित्र अमरनाथ यात्रा आज स्थगित करण्यात आली आहे. काश्मीरमधील खराब हवामानमुळे यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. बालटालमधील पवित्र अमरेश्वर धामची अमरनाथ यात्रा मुसळधार पावसामुळे थांबवण्यात आली आहे. कोणत्याही यात्रेकरूला पवित्र अमरनाथ गुहेकडे …

Read More »

मुख्यमंत्री सिद्धरामय्या सादर करणार आज १४ वा अर्थसंकल्प!

  बेंगळुरू : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या सादर करत असलेला हा 14वा विक्रमी अर्थसंकल्प आहे. त्यामुळे साहजिकच नवीन सरकार आणि सिद्धरामय्या यांच्या बजेटकडून लोकांच्या अपेक्षा जास्त आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या दुपारी 12 वाजता अर्थसंकल्प सादर करतील. याद्वारे राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचे …

Read More »

विद्युत भारित तारेच्या स्पर्शाने सोलापूरच्या भाजी विक्रेत्याचा निपाणीत मृत्यू

  निपाणी (वार्ता) : येथील आठवडी बाजारात भाजी विक्रीसाठी आलेल्या विक्रेत्याला डीपी मधील विद्युत भारित तारेचा स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.६) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. मारुती ज्योत्याप्पा गोलभावी (वय ३२ रा. सोलापूर-संकेश्वर) असे त्याचे नाव आहे. याबाबत पोलीस ठाणे आणि घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, …

Read More »

खानापूर समिती पदाधिकारी निवडीचा तिढा सुटेल!; निमंत्रकांच्या भूमिकेकडे लक्ष

  खानापूर : खानापूर महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी निवडीचा तिढा अधिक गुंतताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत मराठी माणसाचे पुरते पानिपत झाले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा दारुण पराभव झाला. हा पराभव मराठी माणसाच्या जिव्हारी लागणारा होता. निवडणुकीनंतर चिंतन बैठक बोलावणे गरजेचे …

Read More »

बांगलादेशचा कर्णधार तमीम इकबालने घेतली तडकाफडकी निवृत्ती

  ढाका : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला अवघ्या तीन महिन्याचा कालावधी शिल्लक आहेत. त्याआधीच बांगलादेश संघाला मोठा धक्का बसला आहे. बांगलादेशचा कर्णधार तमीम इकबाल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आफगाणिस्तानविरोधात झालेल्या मानहाणीकारक पराभवानंतर तमिम इकबाल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तीन महिन्यानंतर भारतामध्ये विश्वचषक होणार आहे, त्यापूर्वीच नियमीत …

Read More »

खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवल्याने व्याधी मुक्त जीवन

  डॉ. जी. एस. कुलकर्णी; रोटरी क्लबमध्ये डॉक्टर्स डे निपाणी (वार्ता) : दिवसेंदिवस बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे अनेक आजार उद्भवत आहेत. त्याला जेवण पद्धतीही कारणीभूत आहे. उतरत्या वयात कर्करोग, हृदयरोग, स्मृतीभ्रंश, पेशींची कमतरता अशा अडचणी उद्भवतात. सुखी आणि व्याधीमुक्त जीवन जगण्यासाठी खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवून नियमित व्यायाम आवश्यक आहे, असे मत डॉ. जी. …

Read More »