खानापूर : नागरगाळी वन उपविभागातील कुंभार्डा येथील तीन घरांवर वनविभागाच्या पथकाने छापा टाकून अवैध सागवानचे लाकूड व रानडुकराचे मांस जप्त केले. कुंभार्डा कृष्णा नगर (गवळीवाडा) येथील गंगाराम डावू बोडके यांच्या घरावर छापा टाकून 7.088 घनफूट सागवान आणि सुमारे 500 ग्रॅम शिजवलेले रानडुकराचे मांस जप्त केले. दोंडू गावडे यांच्या घरावर …
Read More »हिमाचल प्रदेशात भूस्खलन! शिव मंदिर कोसळून 9 जणांचा मृत्यू
शिमला : हिमाचल प्रदेश राज्यात मोठी दुर्घटना घडली आहे. शिमल्यामध्ये भूस्खलन झाल्याने शिव मंदिर कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. शिमल्याच्या समरहिल येथील बाळूगंजच्या शिव बावडी मंदिराजवळ दरड कोसळल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शिवमंदिर दरडीखाली गाडलं गेलं. दरडीखाली 20 ते 25 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. …
Read More »मराठा महिला, युवक, युवती, उद्योजक व्यावसायिक मेळावा उद्या
बेळगाव : मराठा सेवा संघ बेळगाव यांच्यातर्फे संघाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उद्या मंगळवार दि 15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मराठा महिला, युवक, युवती आणि उद्योजक व्यावसायिक मेळावा आयोजित करण्यात आला आहे गणेश कॉलनी, छ. संभाजीनगर वडगाव येथील मराठा सभागृहात शहर …
Read More »बेळगाव मनपाच्यावतीने ‘माझी माती माझा देश’ अभियान
बेळगाव : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोपीय कार्यक्रमांतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ या अभियान सुरू आहे.या अभियानांतर्गत शिलाफलक, पंच प्रण शपथ, वसुधा वंदन, स्वातंत्र्य सैनिक, वीरांना वंदन या कार्यक्रमांसह प्रत्येक घरी व कार्यालयात तिरंगा फडकविण्यात येत आहे. बेळगाव महापालिकेच्या वतीने या अभियाना अंतर्गत विविध उपक्रम …
Read More »माझे बाबा “मॅनेजमेंट गुरु”
बेळगाव : हलगा येथील प्रगतशील शेतकरी, होलसेल भाजी मार्केट विक्रेते, सामाजिक कार्यकर्ते कै. श्री. यल्लाप्पा मष्णू सामजी यांचे शुक्रवार दिनांक ४ रोजी निधन झाले आज सोमवार दिनांक १४ रोजी त्यांचा अकरा दिवस त्यानिमित्त त्यांच्याबद्दल थोडेसे………. आमचे तीर्थरूप ‘तत्वनिष्ठ बाबा’ म्हणजे अतिशय भारधस्त, सौज्वळ व मनमिळावू व्यक्तिमत्त्व. ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण …
Read More »भारताने मालिका 3-2 ने गमावली, निर्णायक सामन्यात विंडिजने आठ विकेटने मारली बाजी
पाचव्या आणि अखेरच्या टी 20 सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा आठ विकेटने पराभव केला. भारताने दिलेले 166 धावांचे आव्हान वेस्ट इंडिजने आठ गडी आणि बारा चेंडू राखून सहज पार केले. या विजयासह पाच सामन्याच्या मालिकेत वेस्ट इंडिजने 3-2 ने बाजी मारली. वेस्ट इंडिजकडून ब्रैंडन किंग याने नाबाद 85 धावांची खेळी …
Read More »संगमेश्वर नगर येथे भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात बालक जखमी
बेळगाव : बेळगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरातील संगमेश्वर नगर येथे आज भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात आठ वर्षांचा बालक गंभीर जखमी झाला आहे. संगमेश्वर नगर येथे राहणाऱ्या अर्कान रियाज नामक आठ वर्षांच्या कोवळ्या बालकावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्याचे अनेक ठिकाणी चावे घेतले. विशेषतः त्याच्या डोक्याला कुत्र्यांच्या …
Read More »महापालिकेचा प्रताप : मराठी भाषिक नगरसेवकांच्या घरावर चिकटवली नोटीस !
बेळगाव : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीची नोटीस कन्नड व इंग्रजी भाषेत असल्यामुळे मराठी भाषिक नगरसेवकांनी सदर नोटीस स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर मराठी भाषिक नगरसेवकांच्या घरावर नोटीस चिकटविण्याचा प्रताप महानगरपालिकेने केला आहे. पालिकेच्या या कृतीमुळे मराठी भाषिक नगसेवकातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून मराठी भाषेतून नोटीस मिळेपर्यंत सभा होऊ न देण्याचा निर्धार मराठी …
Read More »आई, दोन मुलांसह वाचवण्यासाठी गेलेल्याचाही बुडून मृत्यू
तुमकूर : पाण्यात पडलेल्या आईसह दोन मुलांना वाचवण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीसह चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याची तुमकूर येथील सिद्धगंगा मठाजवळ घडली. गुरांना पाणी पिण्यासाठी बांधलेल्या खड्ड्यात पाय धुण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. मुलाला वाचवण्यासाठी गेलेली आईही बुडाली. दरम्यान, आईला वाचवण्यासाठी गेलेला दुसरा मुलगाही पाण्यात बुडाला. आई आणि दोन …
Read More »चिक्कोडी येथे विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू
चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी येथे विद्युत तारा दुरुस्त करताना खांबावर चढलेल्या एका व्यक्तीला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, चिक्कोडी येथे हेस्कॉमचे कर्मचारी विद्युत वाहिनी दुरुस्त करत असताना सिद्धराम नामक व्यक्तीला खांबावर चढवले असता त्याला विजेचा धक्का बसला आणि त्याचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta