Monday , March 9 2026
Breaking News

Belgaum Varta

गणेशोत्सव संदर्भात पालकमंत्र्यांची आज महत्वपूर्ण बैठक

  बेळगाव : गणेश महामंडळांच्या कोणकोणत्या मागण्या प्रशासनाकडे आहेत यासाठी बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी गणेश महामंडळ तसेच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. आज सोमवार दि. 7 ऑगस्ट रोजी बेळगाव महापालिकेच्या सभागृहात सायंकाळी 5:30 वाजता सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखालीच सदर बैठक होणार आहे. या बैठकीत जिल्हा प्रशासन, पोलीस, …

Read More »

भारताची पुन्हा हाराकिरी! दुसऱ्या टी 20 सामन्यात विडिंजचा दोन विकेटने विजय

  अटीतटीच्या लढतीत वेस्ट इंडिजने भारताचा दोन विकेटने पराभव केला. भारातने दिलेले 153 धावांचे आव्हान विडिंजने दोन आठ विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. विडिंजकडून निकोलस पूरन याने 67 धावांची दमदार खेळी केली. या विजयासह विडिंजने मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. भारताने दिलेल्या 153 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कताना विडिंजच्या फलंदाजांनी …

Read More »

बेळगावच्या खेळाडूंनी मारली बाजी

  बेळगाव : बेंगळुरू येथील सी एम ए ग्रँड हॉल येथे आज दि. 6 ऑगस्ट रोजी झालेल्या जपान शोटोकॉन इंडिपेंडेंस कप ओपन चॅम्पियन स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले आहे. या ओपन चॅम्पियन स्पर्धेत 1500 हून अधिक खेळाडूंनी सहभाग दर्शवला होता. बेळगाव येथील सेल्फ डिफेन्स स्कूल ऑफ इंडियन कराटेच्या विद्यार्थ्यांनी …

Read More »

उत्तराखंडातील गाैरीकुंडमध्‍ये दरड कोसळून ३ ठार; २० बेपत्ता

  उत्तराखंडच्या गौरीकुंडमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्‍ये तिघांचा मृत्यू झाला असून, २० जण बेपत्ता झाले आहेत. उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ धामयात्रेच्या मार्गावर हा अपघात झाला. बचाव पथकामार्फत शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे. बेपत्ता झालेल्यांपैकी १७ नेपाळचे नागरिक आहेत. उत्तराखंडमधील टिहरी गढवाल …

Read More »

तेलंगणातील प्रसिद्ध गायक गदर यांचे निधन

  दक्षिण भारतीय संगीत विश्वातून एक दुःखद बातमी आहे. तेलंगणातील प्रसिद्ध लोकगायक आणि गीतकार गदर यांचं रविवारी (6 ऑगस्ट) रोजी निधन झालं आहे. क्रांतिकारी गीतांसाठी नावाजलेले ‘गदर ‘ यांचं वयाच्या 77व्या वर्षी निधन झालं आहे. वास्तविक, त्यांचं खरं नाव हे गुम्मडी विठ्ठल राव असं होतं. पण, गदर म्हणून त्यांनी सर्वदूर …

Read More »

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला, २४ तासांत ६ हत्या

  इन्फाळ : गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाहीये. गेल्या २४ तासांत मणिपूरमधील तणावग्रस्त भागात पिता-पुत्रासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळपासून बिष्णुपूर-चुराचांदपूर सीमा भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. या भागात झालेल्या हिंसाचारात १६ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे या भागात लष्कराला …

Read More »

दि. खानापूर तालुका प्रायमरी टीचर्स को-ऑप. क्रेडिट सोसायटीची निवडणूक बिनविरोध

  शिक्षकांतून समाधान खानापूर : नेहमीच चर्चेत असलेल्या खानापूर येथील दि. खानापुर तालुका प्रायमरी टीचर्स को-ऑप. सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सभासदांच्या मागणीनुसार ठराव करण्यात आला होता. परंतु ही प्रक्रिया मर्यादित वेळेच्या नंतर झाल्यामुळे ३० उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी १५ उमेदवारांची निवड ही एका ज्येष्ठ सभासदाच्या मतदानाने पार पडण्यात आली. सर्व …

Read More »

बिजगर्णी येथे विद्युत तारेच्या धक्क्याने शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू

  बेळगाव : हेस्कॉम विद्युत वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथील शेतकरी दाम्पत्याचा शेतात काम करत असताना विद्युत तार अंगावर अचानक पडल्याने शॉक लागून शेतकरी दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. 32 वर्षीय निसार महंमद मकबूल सनदी आणि 26 वर्षीय लता निसार सनदी अशी मृतांची नावे असून त्यांना एक लहान मुलगी …

Read More »

मराठी शाळा टिकवायची जबाबदारी प्रत्येकाचीच : आबासाहेब दळवी

  बेळगाव : मराठी माध्यमांच्या शाळा टिकवून ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक गावातील नागरिकांनी घेतली पाहिजे तसेच प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यांना मराठी माध्यमातून शिकविण्यास प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन खानापूर तालुका समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे शनिवारी मनतूर्गा, असोगा व रुमेवाडी गावातील सरकारी मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक …

Read More »

जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी खडकलाट येथील रोहित यादव यांची निवड

  निपाणी (वार्ता) : चिकोडी जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून खडकलाट येथील काँग्रेस कार्यकर्ते व युवा उद्योजक बालाजी उर्फ रोहित राजू यादव यांची निवड करण्यात आली. पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, आमदार प्रकाश हुक्केरी, चन्नराज हट्टीहोळी, गणेश हुक्केरी, माजी आमदार …

Read More »