बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघ – रुक्मिणी नगर स्मशानभूमी रस्ता पाहिलं तर बेळगावात स्मार्ट सिटी योजना कितपत यशस्वी झाली याचा अंदाज तुम्हीचं लाऊ शकता. महापालिका व्याप्ती मधील हे चित्र आहे स्मार्ट सिटी अंतर्गत बेळगाव शहर उपनगरातील रस्ते चकाचक झाल्या असल्याचा दावा करण्यात आला असला तरी पहिल्या पावसातच उपनगरामध्ये …
Read More »एंजल फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना डेंगू प्रतिबंधक लस
बेळगाव : पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता एंजल फाउंडेशनच्या वतीने आज सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना डेंगू प्रतिबंधक लस देऊ केली आहे. येथील फुलबाग गल्ली मधील शाळा नंबर सात मध्ये विद्यार्थ्यांना डेंगू प्रतिबंधक लस देण्यात आली. यावेळी एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके यांच्या हस्ते …
Read More »दर तिसऱ्या शनिवारी ‘नो बॅग डे’
बेळगाव : शाळांत यापुढे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे वाहावे लागणार नसून, शिक्षण खात्याने हा दिवस ‘नो बॅग डे किंवा सेलिब्रेशन सॅटर्डे’ म्हणून घोषित केला आहे. आनंदी वातावरणात मुलांना इतर शैक्षणिक उपक्रम शिकविले जाणार आहेत. राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने (डीएसईआरटी) चालू शैक्षणिक वर्षात दर तिसऱ्या शनिवारी …
Read More »कर्नाटक अर्थसंकल्पावेळी विधानसभेत घुसला तोतया आमदार
बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या अर्थसंकल्प मांडत असतानाच एक तोतया आमदार विधानसभेत घुसला! दुपारी 12 वाजता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शुक्रवारच्या कामकाजाला सुरवात झाली. मात्र त्यावेळी आमदारांची उपस्थितीत कमी होती. त्याचवेळी आमदारांसारखी वेशभूषा केलेली एक व्यक्ती विधानसभेत घुसली आणि थेट आमदारांच्या आसनावर जाऊन बसली. आपण चित्रदुर्ग जिल्ह्यातील मोळकाल्मूरुचे आमदार एन. वाय. गोपालकृष्ण …
Read More »तमीम इक्बालचा २४ तासांत यू-टर्न, निवृत्ती घेतली मागे
ढाका : बांगलादेशचा कर्णधार तमीम इक्बालने गुरुवारी अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 2023 च्या विश्वचषकाच्या तीन महिने आधी घेतलेल्या त्याच्या निर्णयाने बांगलादेश क्रिकेटमध्ये खळबळ उडाली होती. अशा स्थितीत 24 तासांत यू-टर्न घेत त्यांनी आपला निर्णय मागे घेतला आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी हे केले. बांगलादेशने …
Read More »नदीतील पंपसेट काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू
चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील मलिकवाड गावाजवळ दूधगंगा नदीतून मोटार पंपसेट काढण्याच्या प्रयत्नात एका शेतकऱ्याचा विजेच्या तारेला धक्का बसून मृत्यू झाल्याची घटना घडली. वडागोळ गावातील अण्णाप्पा नायडू खोत (४२) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मलिकवाड गावाजवळ दूधगंगा नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने शेतकरी आण्णाप्पा खोत हे एका सहकाऱ्यासह मोटार पंपसेट …
Read More »चापगावात यडोगा हद्दीत घरफोडी, नागरिकांतून घाबराट
खानापूर (प्रतिनिधी) : चापगाव (ता. खानापूर) गावच्या यडोगा रोडवरील रमेश तुकाराम पाटील यांच्या घरात चोरी झाल्याची घटना शनिवारी दि. ८ रोजी उघडकीस आली. चोरट्यांनी पाठीमागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असुन तिजोरी फोडली व त्यातील कपडे अस्ताव्यस्त करून काहीतरी सापडते काय याचा प्रयत्न केला असुन त्यामध्ये कानातील सोन्याचे मनी …
Read More »जैन स्वामींजींच्या हत्येप्रकरणी : दोघा संशयितांना अटक
बेळगाव : दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या हिरेकोडी आश्रमातील एका जैन साधूची हत्या करण्यात आली आहे. हिरेकोडी आश्रमाचे आचार्य कामकुमार नंदी महाराज गेल्या बुधवारी बेपत्ता झाले होते. रायबाग तालुक्यातील कटकबावी गावात महाराजांची हत्या झाल्याची पोलिसांना माहिती आहे. बेळगावचे एसपी संजीव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी …
Read More »मंगाईदेवी यात्रेत भक्तांना अडथळा; मंदिर मार्गावर भिंत बांधल्याने नाराजी
बेळगाव : वडगाव येथील ग्रामदैवत श्री मंगाई देवस्थान पासून मंगाईनगर पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. यामुळे मंगाईनगर येथील रहिवाशांना मंदिराकडे येण्यासाठी सुमारे अर्धा किलोमीटर वळसा घालून यावे लागत आहे. यामुळे गैरसोय होत असून रहिवाशांना मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी मंगाई नगर रहिवाशी संघाने केली आहे. वडगावची …
Read More »पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान हिंसेचा आगडोंब; 9 जणांची हत्या
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं मतदान आज होत आहे. ८ जून रोजी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत राज्यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला असून, यामध्ये १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुरक्षेसाठी तब्बल १ लाख ३५ हजार जवानांना तैनात करण्यात आले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta