Monday , March 9 2026
Breaking News

Belgaum Varta

शिवसेनेच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटीस

  अपात्रतेसंदर्भात म्हणणं मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत मुंबई : शिवसेना शिंदे गटाच्या 16 आमदारांविरुद्धच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच निर्णय घेणार आहेत. त्यातच आता शिवसेनेच्या 40 आमदार आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना अपात्रतेसंदर्भात म्हणणं मांडण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली आहे. विधीमंडळाकडून नोटीस जारी करताना आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी सात दिवसांची …

Read More »

हिरेकुडी येथील बेपत्ता जैन मुनीचा संशयास्पद मृत्यू

  चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील जैन मुनी आचार्य 108 कामकुमार नंदी महाराज स्वामी यांचा मृतदेह शुक्रवारी रात्री संशयास्पदरित्या आढळला आहे. चिकोडी हिरेकुडीमधून जैन मुनी बेपत्ता झाल्याची तक्रार चिकोडी पोलिसात नोंद करण्यात आली होती. शुक्रवारी रात्री उशिरा या जैन मुनींचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला असून त्यांच्या शरीरावर जखमा …

Read More »

वरिष्ठ अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता पोलीस चौकीचे काम

  बेळगाव : छत्रपती धर्मवीर संभाजीराजे परिसरातील पोलीस चौकीचे काम एक दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. यासंदर्भात खडेबाजार एसीपी अरुणकुमार कोळूर यांना मराठा समाजाचे नेते किरण जाधव व छत्रपती संभाजी महाराज सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजता कॅम्प येथील एसीपी …

Read More »

नऊ आमदार वगळता सर्व आमदारांचा शरद पवारांना पाठिंबा? : जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान

मुंबई : अजित पवारांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी केली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या सत्तासंघर्षाला सुरुवात झाली आहे. अजित पवारांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचं पक्षचिन्ह आणि नाव यावरून दोन्ही गटांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठं विधान केलं आहे. अपात्रतेची याचिका दाखल …

Read More »

राज्याचा अर्थसंकल्प दिशाहीन : डॉ. सोनाली सरनोबत यांची टीका

  बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद नाही, अशी प्रतिक्रिया भाजपा बेळगाव ग्रामीण जिल्हा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी दिली. सिद्धरामय्या म्हणाले की, आमचा मंत्र ‘सर्वांसाठी समान वाटा, सर्वांना समान अधिकार’ आहे. विकास आणि सामाजिक न्यायासाठी अर्थसंकल्प मांडत असल्याचे त्यांनी सांगितले. हे हास्यास्पद आहे. …

Read More »

सराफ गल्ली श्री मरगाई देवी मुखवट्याची मिरवणूक तसेच स्थापना व अभिषेक कार्यक्रम भक्तिभावाने साजरा

  बेळगाव : सराफ गल्ली, शहापूर येथील मराठा पंच कमिटीतर्फे आयोजित श्री मरगाई देवी मुखवट्याची मिरवणूक तसेच स्थापना व अभिषेक कार्यक्रम आज शुक्रवारी सकाळी मोठ्या भक्तिभावाने पार पडला. सराफ गल्ली कोपऱ्यापासून काल सायंकाळी श्री मरगाई देवी मुखवट्याची मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. सवाद्य निघालेल्या या मिरवणुकीमध्ये मराठा पंच कमिटीचे सदस्य …

Read More »

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन

  बेळगाव : बेळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, शेतकऱ्यांना एकरी ३० ते ३५ हजार नुकसान भरपाई द्यावी, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र निधी ठेवावा, बेळगावात बायपास किंवा रिंगरोडऐवजी उड्डाणपूल बांधण्यात यासह विविध मागण्यांसाठी आज बेळगाव जिल्हा शेतकरी संघटनेसह इतर संघटनांच्यावतीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना विविध मागण्यांचे …

Read More »

रामपूरच्या शर्यतीत दानोळीची बैलजोडी प्रथम

  महाराष्ट्र बेंदूर सणानिमित्त आयोजन : मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण निपाणी (वार्ता) : रामपूर (ता. चिकोडी) येथे महाराष्ट्र बेंदूर सणानिमित्त आयोजित दुबैली गाड्यांच्या शर्यतीत दानोळीच्या अमोल पोवार यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांकाचे १० आजाराचे बक्षिस पटकाविले. तर बंडा हवालदार-तळदगे व विक्रम शेटे- अक्कोळ यांच्या बैल गाडीने अनुक्रमे द्वितिय व तृतीय क्रमांकाची …

Read More »

ओदिशा रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई; तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक

  नवी दिल्ली : ओदिशा येथील बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयने आज मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने या प्रकरणी रेल्वेच्या तीन अधिकाऱ्यांना अटक केली आहे. सीबीआयने अटक केलेल्या आरोपींमध्ये सीनियर सेक्शन इंजिनिअर अरुण कुमार महांतो, सीनियर सेक्शन इंजिनिअर मोहम्मद आमिर खान आणि टेक्निशियन पप्पू कुमार यांचा समावेश आहे. आरोपींविरोधात …

Read More »

कर्नाटक राज्याचे अर्थसंकल्प जनहिताचे : राजेंद्र पवार वडर

  निपाणी (वार्ता) : कर्नाटकात काँग्रेस सरकार स्थापण होऊन महिना लोटला नाही. इतक्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मांडलेले अर्थ संकल्प हे योग्य आणि जनसामान्य जनतेचा विचार करून मांडण्यात आलेले आहे. या अर्थ संकल्पआत कष्टकरी, शेतकरी, गोर गरीब आणि जनसामान्य जनतेचा विचार करून अर्थ संकल्प सादर करण्यात आले आहे. तो अर्थसंकल्प सर्वांनाच …

Read More »