Monday , September 21 2026
Breaking News

राज्याचा अर्थसंकल्प दिशाहीन : डॉ. सोनाली सरनोबत यांची टीका

Spread the love

 

बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद नाही, अशी प्रतिक्रिया भाजपा बेळगाव ग्रामीण जिल्हा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी दिली.
सिद्धरामय्या म्हणाले की, आमचा मंत्र ‘सर्वांसाठी समान वाटा, सर्वांना समान अधिकार’ आहे. विकास आणि सामाजिक न्यायासाठी अर्थसंकल्प मांडत असल्याचे त्यांनी सांगितले. हे हास्यास्पद आहे. हा अर्थसंकल्प पाहता सर्वांसाठी समान वाटा कुठे, सर्वांसाठी समान कुठे? हा अर्थसंकल्प राजकीयदृष्ट्या प्रेरित अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प अल्पसंख्याकांना वेठीस धरण्यासाठी ठेवण्यात आल्याचे दिसते. विकास नाही, सामाजिक न्याय नाही. बहुसंख्य हिंदूंच्या कल्याणासाठी कोणतेही अनुदान आणि योजना नाहीत. हा लोकविरोधी अर्थसंकल्प आहे. त्यांनी पहिल्या वर्षीच 85 हजार कोटींचे कर्ज दाखविल्याची टीका सोनाली सरनोबत यांनी केली.कोणताही पुर्वविचार न करता कोणत्याही राज्याच्या विकासासाठी या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आलेली नाही.
• एपीएमसी कायदा रद्द करणे.
• भाग्यलक्ष्मी योजना (भाग्यलक्ष्मी बाँड) रद्द करणे.
• जिल्ह्याने स्थापन केलेली गोशाळा योजना रद्द करणे
• नवीन शैक्षणिक धोरण (NEP) रद्द करणे
• अग्निवीर योजनेसाठी युवा प्रशिक्षण योजना रद्द करणे
• मुलांसाठी मोफत बस योजना रद्द करणे
• स्वामी विवेकानंद युवा संघटना रद्द करणे
विवेका शाळेच्या खोल्या बांधण्याची योजना रद्द करणे
• भुसिरी योजना रद्द करणे
• भूजल वाढवण्यासाठी “जलनिधी” योजना रद्द करणे.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा हा अर्थसंकल्प आहे. काँग्रेस सरकारकडे विकासाचे विचार नसल्याचे या अर्थसंकल्पात दिसून येत आहे, असेही शेवटी डॉ. सरनोबत म्हणाल्या.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *