हुतात्म्यांना विनम्र अभिवादन उचगाव : बेळगाव ग्रामीण मतदार क्षेत्रातील विधानसभेसाठी उभे असलेले महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांच्या सदाशिवनगर येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये १९८६ च्या आंदोलनामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजेत. हुतात्म्यांचे स्वप्न साकार करूया …
Read More »काँग्रेसतर्फे काकासाहेब पाटील यांचा अर्ज दाखल
रविवारी आप्पाचीवाडीमध्ये प्रचाराचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : येथील माजी आमदार आणि अखिल भारतीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार काकासाहेब पाटील यांनी गुरुवारी (ता.२०) सकाळी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी मंत्री वीकुमार पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, निपाणी भाग काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजेश कदम यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. …
Read More »रमाकांत कोंडुसकर उद्या उमेदवारी अर्ज भरणार
बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदार संघाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत दादा कोंडुसकर यांचा उमेदवारी अर्ज उद्या दिनांक 20 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता भरण्यात येणार आहे. आंबेडकर भवन येथून सुरू होऊन आरटीओ सर्कल सोन्या मारुती मंदिरपासून भव्य मिरवणुकीद्वारे शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात येणार आहे. तरी दक्षिण …
Read More »बेळगाव जिल्ह्यात आज 79 तर एकूण 229 उमेदवारी अर्ज दाखल
बेळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव जिल्ह्यामध्ये आज बुधवारी दिवसभरात एकूण 79 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये 71 पुरुष आणि 8 महिला उमेदवारांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 229 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज बुधवारी पाचव्या दिवशी सर्वाधिक …
Read More »भाजपचे विठ्ठलराव हलगेकर यांचा जोरदार शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर मतदार संघात पहिल्या दिवसापासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खानापूर शहरात शक्तिप्रदर्शन होत आहे. मात्र बुधवारी दि. १९ रोजी भाजपचे उमेदवार विठ्ठलराव सोमान्ना हलगेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शक्ती प्रदर्शन केले. यावेळी मिरवणुकीची सुरूवात जांबोटी क्राॅसवरील बसवेश्वर पुतळ्याला पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. प्रसंगी जवळपास …
Read More »खानापूर आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांतून नाराजी
पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेताच उमेदवाराचे नाव जाहीर खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात गेल्या दोन वर्षापासुन खानापूर आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी खेडोपाडी जाऊन समस्यांचे निवारण केले. खेड्यापाड्यात आम आदमी पक्षाचा प्रसार करून लोकाच्या मनात आम आदमी पक्षाबदल आदर निर्माण केला. सरकारी कार्यालयात लोकांच्या समस्यांचे निवारण केले. खानापूर आम आदमी पक्ष …
Read More »हिंमत असेल तर भाजपने मतपत्रिकेद्वारे निवडणूका घ्याव्या; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान
बेळगाव : भारतीय जनता पक्ष देश लुटत आहे. पंतप्रधान मोदींचे निकटवर्तीय धनाढ्य बनत चालले आहेत. तर दुसरीकडे देश कंगाल बनत चालला आहे अशी टीका करून भाजपने पराभव स्वीकारला पाहिजे. भाजपच्या पराभवाची सुरुवात कर्नाटकातून होणार आहे. मोदी लाटेवर भाजपचा विश्वास असेल तर त्यांनी मतपत्रिकेद्वारे निवडणूका घ्याव्या, असे आवाहन आम आदमी …
Read More »आर. एम. चौगुले यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन!
बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणूकीसाठी ग्रामीण मतदारसंघातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांनी आज दुपारी भव्य मिरवणुकीद्वारे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ग्रामीण मतदारसंघातून मतदान प्रक्रियेद्वारे 131 सदस्यांच्या निवड कमिटीने आर. एम. चौगुले यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली होती. आज आर. एम. …
Read More »गडकरी, फडणवीस भाजपचे स्टार प्रचारक
बेळगाव : एकीकडे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती महाराष्ट्रातील भाजपा आणि काँग्रेसला पत्र लिहून आपल्या नेतेमंडळींना समितीच्या विरोधात प्रचारासाठी पाठवू नका अशी विनंती करत असताना दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे माजी …
Read More »सीमाभागात केळीबागांना तापमानाचा फटका
बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, कोगनोळी परिसरातील चित्र कोगनोळी : गेल्या पंधरवड्यापासून निपाणी तालुक्यात तापमानाचा पारा वाढला असून सकाळी ८ वाजल्यापासून उन्हाचे चटके जाणवत आहेत. एप्रिल महिन्यात ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केळी पिकावर तापमानाचा परिमाण होत आहे. अशा परिस्थितीत केळीच्या बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. कोगनोळीसह सीमाभागात अनेक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta