Tuesday , April 21 2026
Breaking News

नंदगड मार्केटिंग सोसायटीमधील खत विक्री गैरव्यवहाराबद्दल चौकशी करा

Spread the love

 

खानापूर समितीकडून लोकायुक्तांकडे जाण्याचा इशारा

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने एडी ऑफिसर खानापूर यांना ३० जून रोजी खानापूर तालुका मार्केटिंग सोसायटी नंदगड मधील खत विक्रीच्या गैरव्यवहाराबद्दल निवेदन देण्यात आले. सदर सोसायटीच्या माध्यमातून सरकारमान्य दरानुसार खतांची विक्री करण्याचा नियम आहे. परंतु सरकारी नियम धाब्यावर बसवून या संस्थेचे चेअरमन आणि संचालक मंडळ तसेच संस्थेचे व्यवस्थापक यांनी मनमानी करत प्रत्येक खताच्या पोत्यामागे रू. ५० ते रू. ६० च्या वाढीव दराने खत विक्री केली. महाराष्ट्र एकीकरण समितचे नेते, प्रगतशील शेतकरी श्री. रुकमाना झुंजवाडकर (खैरवाड) आणि श्री. रमेश धबाले चापगांव यांच्या निदर्शनास आले आणि त्यांनी याचा जाब विचारला. सदर संस्थेकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने दोघांनी तालुका कृषी अधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी तसेच तालुक्याचे नुतन आमदार श्री. विठ्ठलराव हलगेकर यांच्या निदर्शनास आणून रितसर तक्रार केली. परंतु अद्याप सदर संस्थेवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. विशेष म्हणजे सदर संस्थेच्या व्यवस्थापकाने ही चुक मान्य केल्याचे पत्र तालुका आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना दिले आहे, तसेच क्षमायाचना केली. यासाठी आजपर्यंत कित्येक वर्षे या संस्थेतून असाच प्रकार चालत आला असून शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून घेणाऱ्यांनी लूट केली आहे. तरी सरकारने यामध्ये त्वरित लक्ष्य घालून रितसर चौकशी करावी आणि ज्या ज्या शेतकऱ्यांची पिळवणूक केलेली आहे त्यांचे पैसे परत करावे आणि संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र एकीकरण समितीने लोकायुक्तांकडे जाण्याचा इशारा दिला आहे. यावेळी माजी आमदार दिगंबरराव पाटील, आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, रुकमाना झुंजवाडकर, रमेश धबाले, शंकर गावडा इत्यादी समिती नेते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री नागेश महारुद्र मंदिर कळसाची शोभायात्रा 20 एप्रिल रोजी

Spread the love  खानापूर : नागुर्डा, नागुर्डावाडा आणि विश्रांतवाडी या परिसरातील ग्रामस्थांचे आराध्य व थळदैवत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *