Tuesday , December 16 2025
Breaking News

Belgaum Varta

कोगनोळी टोलवर ५ लाख ८२ हजार जप्त

  पोलिस बंदोबस्त : दुसऱ्या दिवशी कार्यवाही कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यामध्ये ५ लाख ८२ हजार ५०० रुपये सापडल्याची घटना शनिवारी (दि. ८) रोजी ३ च्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक …

Read More »

कार्यकर्त्यांनाच पक्ष मानून निवडणूक रिंगणात : उत्तम पाटील

बोरगावमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद   निपाणी (वार्ता) : कोणत्याही कार्यात पारदर्शकता असनणे ही सहकारत्न रावसाहेब पाटील यांची शिकवण आहे. सार्वजनिक जीवनात काम करताना सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून काम करा. कोणत्याही पदाची अपेक्षा करू नका, अशी शिकवण आहे. त्या अनुषंगाने आमचे काम सुरू असून सामान्य जनतेची सेवा हेच अरिहंत  कुटुंबीयांची शिकवण असल्याचे मत …

Read More »

‘माझी बोली माझी कथा’ कथासंग्रहात; निपाणीतील कन्येच्या ‘झटाझोंब्या’चा समावेश

निपाणी (वार्ता) : डॉ. मोनिका ठक्कर यांच्या ‘माझी बोली माझी कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईतील राजभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते झाले. या पुस्तकात ‘माझी बोली माझी कथा’ या ५७ बोलीतील कथासंग्रहात निपाणीतील कन्या सुचिता घोरपडे यांच्या कोल्हापुरी बोलीतील ‘झटाझोंबी’ कथेचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे निपाणीतील साहित्य …

Read More »

आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करा

मंडल पोलिस निरीक्षक पाटील : निपाणीत जवान, पोलिसांचे पथसंचलन निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणूक जवळ आली असून या काळात मतदारांना विविध अमिष दाखवण्यासह दमदाटीचे प्रकार घडतात. त्याला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन मंडल पोलिस निरीक्षक एस सी पाटील यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या …

Read More »

काँग्रेसला आणखी ६० जागा गमवाव्या लागतील

  मुख्यमंत्री बोम्मईंचे भाकीत, काँग्रेसकडे योग्य उमेदवार नसल्याचा दावा बंगळूर : काँग्रेसकडे सुमारे ६० जागांवर योग्य उमेदवार नाहीत. परिणामी १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गेल्या वेळेपेक्षा वाईट कामगिरी करत पक्षाचा पराभव होईल, अशी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी टिप्पणी केली. ते म्हणाले की, काँग्रेसकडे केवळ उमेदवारच नाहीत, तर राज्यात …

Read More »

कुर्ली गावाने कायम काँग्रेस पक्षाला भरभरुन मतदान दिले : माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचे प्रतिपादन

  कुर्लीत काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक कोगनोळी : कुर्ली गावाला स्वातंत्र सैनिकांचा इतिहास आहे. कुर्ली गावाने कायम काँग्रेस पक्षाला भरभरुन मतदान दिले आहे. आपल्यापासून काही लोक दुरावले असतील पण कार्यकर्ते हे काँग्रेस पक्षासोबतच आहेत. येत्या निवडणुकीत मी स्वतः कुर्ली गावात लक्ष घालून पक्षाला सर्वांधिक मताधिक्य देणार असल्याचे प्रतिपादन माजी ऊर्जामंत्री वीरकुमार …

Read More »

कोगनोळी टोलवर ७ लाख ५० हजार जप्त

  पोलिसांची कारवाई : एक जण ताब्यात कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यामध्ये ७ लाख ५० हजार रुपये सापडल्याची घटना शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी …

Read More »

खानापूरात अधिकाऱ्यांची दादागिरी; समिती कार्यालयासमोरील नामफलक काढला

  खानापूर : आचारसंहिता लागल्यापासून निवडणूक आयोगाने अनेक कडक निर्बंध घालून प्रचार अथवा बॅनरबाजीवर करडी नजर ठेवली आहे. खानापूरातील समिती संपर्क कार्यालयाचे नामफलकावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी फलक सक्तीने काढला आहे. नगरपंचायतीची रीतसर परवानगी घेऊन संपर्क कार्यालयाचा फलक लावला असताना हा फलक अवैध कसा असू शकतो असा जाब समिती …

Read More »

मदन बामणे यांचा उमेदवारी अर्ज समितीकडे दाखल

  बेळगाव : शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे धडाडीचे युवा नेते मदन बाबुराव बामणे यांनी दक्षिण मतदार संघात विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज शहर समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. मदन बामणे हे मागील 23 वर्षांपासून समितीमध्ये कार्यरत आहेत तर मागील 20 वर्षांपासून शहर समितीचे कार्यकारिणी सदस्य आहेत. आजपर्यंत समितीने पुकारलेल्या प्रत्येक लढ्यात …

Read More »

खानापूर नगरपंचायतीचा अनागोंदी कारभार; अपूर्व पाणी पुरवठा

खानापूर : नगरपंचायतीत अनागोंदी कारभार चालू आहे. नेहमी या- ना त्या कारणावरून चर्चेत असलेली नगरपंचायत शहराला पाणीपुरवठा करण्यात कुचकामी ठरलेली आहे. नगरपंचायतीच्या उंबरठ्यावर असलेल्या शाहूनगर (डोंबारी वसाहत) परिसरात अनियमित पाणीपुरवठा होत असल्यामुळे तेथील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. वारंवार मागणी करून देखील संबंधित नगरसेवक व नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांचे …

Read More »