निलावडे (तानाजी गोरल) : खानापूर तालुक्यात गेल्या आठवड्याभरात आगीचा वनवा पडण्याचे प्रकार अधिक प्रमाणात वाढले आहेत. दररोज एक-दोन ठिकाणी आग लागून शेतवडी साहित्याचे नुकसान होत आहे. आज शनिवारी देखील खानापूर तालुक्यातील निलावडे येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून शेतवडीतील काजू, चिकूची झाडे तसेच गवतगंजीसह शेतीचे बरेसे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. …
Read More »येळ्ळूरमध्ये उद्या 18 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन
अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी खास आकर्षण : संमेलनाची तयारी पूर्ण येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने उद्या रविवार दि. 19 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरीत (मराठी मुलांची शाळा येळळूरवाडी पटांगण परमेश्वर नगर येळळूर) 18 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून साहित्य संमेलन आयोजनाची तयारी …
Read More »मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्या वतीने शहापूर स्मशानभूमीत महाशिवरात्र साजरी
बेळगाव – सालाबादप्रमाणे यावर्षीही शहापूर येथील मुक्तिधाम स्मशानभूमीत मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्या वतीने महाशिवरात्री साजरी करण्यात आली. गेल्या 24 वर्षांपासून शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमी मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्या वतीने महाशिवरात्र सोहळा आयोजित केला जातो. महाशिवरात्रीनिमित्त मध्यरात्री आणि पहाटे अभिषेक, पूजा, आरती आदी कार्यक्रम पार पडले. त्यानंतर सकाळपासून प्रसाद वाटप करण्यात …
Read More »निपाणी ‘हर, हर महादेव’चा गजर!
दर्शनासाठी भाविकांची गर्दी : पुण्याच्या कलाकाराकडून फुलांची आकर्षक सजावट निपाणी (वार्ता) : शहरासहसह परिसरातील शिवमंदिरात शनिवारी महाशिवरात्री विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त शिवमंदिरांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. येथील महादेव गल्लीतील शतकोत्तर परंपरा असलेल्या महादेव मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई, रंगरंगोटी केल्याने मंदिर परिसर उजळून गेला आहे. शनिवारी …
Read More »चंदगड तालुका उद्धव ठाकरे शिवसेनेकडून शिंदे गट व निवडणुक आयोगाचा जाहीर निषेध
शिनोळी : उद्धव ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. प्रभाकर खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गट व निवडणूक आयोगाचा निषेध व्यक्त करून आम्ही सगळे पक्षप्रमुख मा श्री. ऊद्धव ठाकरे यांच्यासोबत चंदगड तालुका पूर्णपणे उभा असल्याचे सांगितले. शिंदे गटाने कितीही दबाव व आमिषे दाखवली तरी तालुक्यातील लोक त्याला बळी पडणार नाहीत व येणाऱ्या …
Read More »लक्ष्मी हेब्बाळकर-रमेश जारकीहोळी समर्थक आमनेसामने
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील राजहंसगड येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या अनावरण सोहळ्यावरून श्रेयवादाचे राजकारण चांगलेच रंगले आहे. आज राजहंसगड परिसरात काँग्रेस आमदार चन्नराज हट्टीहोळी व भाजपा नेते रमेश जारकीहोळी सामोरासमोर आले. त्यावेळी उभयतांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मूर्ती अनावरण सोहळ्यावरून भाजपा -काँग्रेसमध्ये श्रेयवादाचे राजकारण सुरू …
Read More »राज्याचा लोकप्रिय अर्थसंकल्प : भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत
विविध विभागासाठी मुबलक निधी बेळगाव : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अर्थसंकल्पात विविध विभागांसाठी मुबलक निधी तरतूद केल्यामुळे हा एक लोकप्रिय अर्थसंकल्प ठरल्याची प्रतिक्रिया भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी दिली. शिक्षणासाठी ३,७९,५६० कोटी देऊन बजेटमध्ये 12 टक्के निधी शिक्षणासाठी राखीव ठेवला आहे. जलसंपदा विभागासाठी 22,854 कोटी रुपयांची तरतूद करून …
Read More »कित्तूर राणी चन्नम्मा सैनिक स्कूलसाठी निपाणीच्या विद्यार्थिनींची अभिनंदनीय निवड
निपाणी : नुकत्याच पार पडलेल्या कित्तूर राणी चन्नम्मा सैनिक स्कूल कित्तूर, येथे इयत्ता सहावीच्या वर्गासाठी प्रवेश निवड चाचणी प्रक्रियेमध्ये, सरस्वती नवोदय प्रशिक्षण केंद्र निपाणीच्या विद्यार्थिनी कु. सुप्रना प्रकाश कांबळे, कु. नंदिनी नारायण जाधव, कु. आलिशा इरफान नदाफ या तीन विद्यार्थिनींनी भरघोस असे उत्तुंग यश संपादन करून, त्यांची अभिनंदनीय निवड …
Read More »खानापूर हेस्काॅमच्या कार्यालयात ग्राहक मेळावा संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराजवळील शिवाजी नगरात दत्ताराम गावडे यांच्या घराच्या गेटजवळ विद्युत खांब्याच्या आधारासाठी तार रोवली आहे. त्यामुळे वाहन घेऊन जाण्यास अडचण भासत आहे ती तार काढावी, अशी मागणी करण्यात आली. जयराम पाटील यांच्या शेतात गेल्या दोन वर्षांपासुन दोन विद्युत खांबे पडले आहेत ते बदलावे अशी मागणी केली …
Read More »महाशिवरात्री निमित्त मलप्रभा आरतीत सहभागी व्हा
खानापूर : खानापूर तालूक्यातील जांबोटी गावच्या पश्चिमेला २३ कि.मी. (९.९ मैल) कणकुंबी गावात ७९२.४ मिटर (२,६०० फूट) ऊंचीवर मलप्रभा नदीचा उगम सह्याद्री पर्वतात होतो. ज्याला “दक्षिण काशी” म्हटले जाऊ शकते. नदी उगमस्थान येथे श्री माऊली देवीला समार्पित एक प्राचीन मंदिर आहे. मलप्रभाचे जन्मस्थान हे पौराणिक उत्पत्ती असलेले तीर्थक्षेत्र आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta