Thursday , September 19 2024
Breaking News

Belgaum Varta

सीमाप्रश्नी लक्ष वेधण्यासाठी स्वातंत्र्यदिनी पाटील मळा कंग्राळी खुर्द येथून पंतप्रधानांना पत्रे

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या आवाहनाला प्रतिसाद बेळगाव : बेळगाव, कारवार, निपाणी,भालकी, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा याकरिता गेल्या ६५ वर्षांपासून लढा सुरु आहे. अनेकांनी हा प्रश्न सुटावा याकरिता आपले जीवन समर्पित केले, काहींनी तर आपले बलिदान गेले. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सीमाप्रश्‍नी मा.पंतप्रधानांनी लक्ष घालून सीमाप्रश्न लवकरात लवकर …

Read More »

नामदेव पत्ताडे यांना ‘ऑगस्ट क्रांती पुरस्काराने’ सन्मानित…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : एलआयसी विमा या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कोल्हापूर विभागातील गडहिंग्लज शाखेचे विमा प्रतिनिधी नामदेव धोंडीबा पत्ताडे यांना नुकताच ‘ऑगस्ट क्रांती पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. नामदेव पत्ताडे हे चंदगड तालुक्यातील विंझणे या गावचे विमा प्रतिनिधी म्हणून मागील १० वर्षांपासून काम करत असताना, त्यांनी गाव-खेड्यातील लोकांना विम्याचे महत्त्व, …

Read More »

वर्गमित्रानी घडविले माणुसकीचे दर्शन…

मित्राच्या निधनानंतर संवगड्यानी केली मदत चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : तडशींनहाळ गावातील तरुण कै.मोहन कांबळे यांचे गेल्या जून महिन्यात निधन झाले. अचानक त्यांच्या जाण्याने त्यांचा कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, २ मुली आहेत. वरील झालेली दुर्देवी घटना समजताच कधी काळी आपल्या सोबत खेळणारा आणि एकाच डब्यातील भाकरी …

Read More »

जिव्हाळा फाऊंडेशनच्यावतीने वृद्धाश्रमात स्वातंत्र्य दिन साजरा

बेळगाव : भारताचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन जिव्हाळा फाऊंडेशनच्यावतीने संजीवनी फाऊंडेशन वृद्धाश्रमात एकत्रपणे साजरा करण्यात आला. डॉक्टर अनिल पोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिव्हाळा फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुरेखा पोटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्वातंत्र्य लढ्यात  योगदान दिलेल्या स्वातंत्र्य योध्यांबद्दल आदर व्यक्त करून त्यांना अभिवादन केले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व …

Read More »

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनी आम्ही घडवला इतिहास : श्रीकांत काकतीकर

दुर्गम घनदाट जंगलातील नदी किनाऱ्यावर लसीकरण आणि आरोग्य शिबीर बेळगाव : आज देशभरात सर्वत्र अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता. स्वातंत्र्यदिनाची सुट्टी सर्व जण आपापल्यापरीने आनंदात घालवत होते. अशा या आनंदाच्या दिवशी धो-धो कोसळणाऱ्या पावसात, दुर्गम भागातील घनदाट जंगलातील, खाचखळग्यांनी भरलेल्या रस्त्यातून चालत जात. कणकुंबी प्राथमिक आरोग्य …

Read More »

मंडपासाठी पोलीस खात्याकडून प्रत्यक्ष पाहणी केली जाईल : मार्केट एसीपी सदाशिवराव कट्टीमनी

बेळगाव (वार्ता) : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना श्रीमूर्ती प्रतिष्ठापन करण्यास मंदिर किंवा कार्यालय नाही, तशा गल्लीची पोलीस खात्याकडून प्रत्यक्ष पाहणी करून वरिष्ठ पोलीस अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून दहा बाय दहा मंडप उभारण्यास परवानगी देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्‍वासन शुक्रवारी मार्केट पोलिस ठाण्यात झालेल्या लोकमान्य टिळक गणेश महामंडळ व सार्वजनिक …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या आवाहनाला प्रतिसाद

बेळगाव (वार्ता) : सीमाप्रश्‍न सुटावा यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलने करण्यात आलेली आहेत. मात्र अजूनही लढ्याला यश आलेले नाही. त्यामुळेसीमाप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, यासाठी पाठविण्यात आलेल्या पत्रांची मोदी यांनी दखल घ्यावी आणि मराठी भाषिकांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माजी महापौर सौ. रेणु किल्लेकर यांनी …

Read More »

सीमाप्रश्नी लक्ष वेधण्यासाठी स्वातंत्र्यदिनी अष्टे येथून पंतप्रधानांना पत्रे

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या आवाहनाला प्रतिसाद बेळगाव (वार्ता) : बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा याकरिता गेल्या ६५ वर्षांपासून लढा सुरु आहे. अनेकांनी हा प्रश्न सुटावा याकरिता आपले जीवन समर्पित केले, काहींनी तर आपले बलिदान गेले. सामान्य मराठी माणसापासून ते विविध नेत्यांनी, पत्रकारांनी, कवी-लेखकांनी, कलाकारांनी आपआपल्या …

Read More »

राजहंस गडावर खडा पहारा…

बेळगाव : नरगुंदकर भावे चौकानंतर आता पुतळा उभारण्यासाठी शिव छत्रपतींचा राजहंस गड टार्गेट करण्यात आल्याची माहिती हाती मिळताच येळ्ळूर आणि परिसरात एकूण 100 हून अधिक कार्यकर्ते सध्या राजहंस गडावर खडा पहारा देत आहेत. जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांच्यासह एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, संतोष मंडलिक, दत्ता उघाडे, राजू पावले, सतीश …

Read More »

गणेशोत्सवावर निर्बंध तर, निवडणुका ही पुढे ढकला : म. ए. युवा समितीची मागणी

बेळगाव (वार्ता) : सार्वजनिक गणेशोत्सवावरील कडक निर्बंध हटवा नाहीतर निवडणूक सुद्धा पुढे ढकलण्यात याव्यात यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती मार्फत बेळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.बेळगावच्या वैभवशाली गणेशोत्सवावर मागील वर्षापासून कोरोना महामारीमुळे कडक निर्बंध घालण्यात आले आहेत, यावर्षी सुद्धा कोरोनाचे कारण पुढे करत कडक निर्बंध घालत असतानाच महानगरपालिका निवडणुका जाहीर …

Read More »