मुंबई : बंड पुकारून सत्तांतर घडवणाऱ्या शिंदे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरेंसोबत उरलेले शिवसेना आमदार या सर्वांना विधिमंडळ सचिवांनी नोटीस बजावली आहे. अपवाद फक्त आदित्य ठाकरे यांचा. दोन्ही गटांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या वेळी आणि बहुमत चाचणीवेळी व्हिपचं उल्लंघन केल्याचा परस्परविरोधी दावा केला होता आणि त्यासंदर्भात विधिमंडळ सचिवांकडे तक्रारी देखील केल्या …
Read More »सद्गुरुंचे सानिध्य लाभल्यास अंतरबाह्य सार्थक मिळते!
प. पू. महेशानंद स्वामीजी यांचे प्रतिपादन कोगनोळी : मानवी जीवनाचे अंतरबाह्य सार्थक हे सद्गुरुंच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळे मिळते असे विचार प. पू. महेशानंद स्वामीजी यांनी व्यक्त केले. हंचिनाळ के. एस. (ता. निपाणी) येथील प. पू. ईश्वर स्वामीजी भक्ती योगाश्रम मठामध्ये गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित प्रवचन सोहळ्यामध्ये संतांचे जीवन चरित्र या विषयावर पाचवे …
Read More »कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच, राधानगरी धरण निम्मे भरले
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची सलग संततधार सुरू असल्याने तसेच धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या जोरदार पावसाने पंचगंगेची पाणीपातळी इशारा पातळीकडे वाटचाल करत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये पंचगंगेच्या पाणीपातळीत दीड फुटांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे राधानगरी धरणही 50 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील इतर प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीमध्येही वाढ होत …
Read More »ही ‘खावा समिती’ कोण?
बेळगाव : खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे आपल्या भाषणात सीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करावी अशी जाहीर घोषणा केली. सदर घोषणा करण्यापूर्वी त्यांनी सांगितले की, मला सीमाभागातील एक शिष्टमंडळ नुकतेच भेटून गेले. आजवर सीमाप्रश्नासंदर्भात जे काही छोटे-मोठे कार्यकर्ते …
Read More »पंढरपूरजवळ झालेल्या अपघातात बेळगावच्या दोघांचा मृत्यू
बेळगाव : बेळगावमधील अनगोळ येथील पाच भाविक सेल्टोस गाडीने पंढरपूरकडे येत असताना रविवारी पहाटे कासेगाव फाटा (ता. पंढरपूर) येथे अपघात झाला. या अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. या अपघातात राजू संभाजी शिंदोळकर (वय ४५, रा. अनगोळ, ता. बेळगाव), परशुराम संभाजी झंगरूचे (वय ५० …
Read More »राज्यावरील दु:ख, संकट, सर्व अडचणी दूर होवो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विठुरायाला साकडे
पंढरपूर : राज्यभर उत्साह आहे. आषाढीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपुरात विठुरायाची महापूजा पार पडली. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही पहिलीच महापूजा पार पडली आहे. पहाटे 3 वाजून 10 …
Read More »भारताचा इंग्लंडवर 49 धावांनी विजय; मालिकेत 2-0 आघाडी
बर्मिंगहॅम : भारताने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडसमोर विजयासाठी 171 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र इंग्लंचा संपूर्ण संघ 121 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पोहचला. भारताने 49 धावांनी सामना जिंकत ज्या मैदानावर इंग्लंडने कसोटीत भारताला मात दिली होती त्याच एजबेस्टनमध्ये टी 20 सामन्यात भारताने इंग्लंडला मात देत मालिकेवर कब्जा केला. भारताकडून भुवनेश्वर कुमारने भेदक …
Read More »जेबुरला हरवून रिबिकानाने जिंकले ग्रँडस्लॅम
चार ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी एक असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. आज (९ जुलै) कझाकिस्तानची एलेना रिबाकिना आणि ट्युनिशियाच्या ओन्स जेबुर यांच्यात महिला एकेरीची लढत झाली. एलेना रिबाकिनाच्या रुपात विम्बल्डनला नवीन विजेती मिळाली आहे. पेट्रा क्विटोवानंतर रिबाकिना विम्बल्डन विजेतेपद पटकावणारी दुसरी सर्वात तरुण खेळाडू ठरली आहे. तिने ओन्स …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतल्या दिग्गजांच्या भेटीगाठी
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी भाजपमधील अनेक दिग्गजांच्या भेटीगाठी घेतल्या. शुक्रवारी गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून सुरु झालेला भेटीचा सिलसिला शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर संपला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …
Read More »रानिल विक्रमसिंघे पंतप्रधान पदावरून पायउतार, नागरिकांच्या तीव्र आंदोलनानंतर निर्णय
कोलंबो : मागील काही काळापासून श्रीलंका आर्थिक संकटाला सामोरं जात आहेत. हजारो नागरिक रस्त्यावर उतरून सरकारविरोधी आंदोलनं करत आहेत. शनिवारी मोठ्या संख्येने आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घातला. यामुळे श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांना त्यांच्या निवासस्थानातून पळ काढावा लागला आहे. हजारो आंदोलकांना पळवून लावण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तरीही आंदोलक मागे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta