संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेत देशाचा अमृतमहोत्सव स्वातंत्र्य दिन हर घर तिरंगा अभियानाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेचे अध्यक्षस्थान नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी यांनी भूषविले होते. सभेला उद्देशून बोलताना मुख्याधिकारी आर. सी. चौगुला म्हणाले बेळगांव जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली संकेश्वर पालिका हर घर …
Read More »बोगस पत्रकारांवर आळा बसणार!
बेळगाव : जिल्ह्यातील अनेक भागात यूट्यूब चॅनल आणि अनधिकृत पत्रकारांचा त्रास वाढत असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे वृत्त विभागाच्या यादीतील माध्यम संस्थांच्या वतीने क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांनाच जिल्हा प्रशासनाकडून ओळखपत्र देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले आहे. अनधिकृत पत्रकारांविरोधात तक्रारी आणि ‘प्रेस’ नावाच्या गैरवापरावर नियंत्रण यासंदर्भात …
Read More »खिळेगाव- बसवेश्वर पाणी योजना डिसेंबरमध्ये पूर्ण होईल : आमदार श्रीमंत पाटील
अथणी : दुष्काळ भागातील शेतकऱ्याचा वरदान ठरणाऱ्या खिळेगाव बसवेश्वर पाणी योजना डिसेंबरमध्ये पूर्ण होऊन शेतकऱ्यांना पाणी मिळणार याचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार असून तलाव भरण्याच्या कामाचा शुभारंभ ही त्याच दिवशी करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार श्रीमंत पाटील यांनी दिली. चमकिरी बँडरहटी रस्ता दोन कोटी, गुंडेवाडी …
Read More »8 ऑगस्ट रोजी आयोजित धरणे आंदोलन यशस्वी करू
खानापूर तालुका म. ए. समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई यांचे आवाहन बेळगाव : 8 ऑगस्ट रोजी मध्यवर्ती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित केलेल्या धरणे आंदोलनामध्ये बहुसंख्येने उपस्थित राहून जोमाने धरणे आंदोलन यशस्वी करूया असे आवाहन खानापूर तालुका म. ए. समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी केले. खानापूर म. ए. समितीची बैठक आज …
Read More »ऐनापूरला मंदिर कळस निर्मिती समारंभ
आ. श्रीमंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन : उत्तम बांधकामाबाबत प्रशंसा कागवाड : ऐनापूर येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचा कळस उभारणी समारंभ माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांच्या हस्ते झाला. तत्पूर्वी त्यांनी येथे बांधलेल्या मंदिराची पाहणी करून उत्तम बांधकाम झाल्याची पोचपावती दिली. ऐनापूर येथे विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून …
Read More »निपाणीत शनिवारी मोफत पोट विकारावर शिबिर
निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील के. एल. ई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि निपाणी रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने लिव्हरतज्ञ, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. संतोष हजारे यांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर रोटरी हॉल निपाणी येथे होणार आहे. शनिवारी (ता.6) सकाळी 10 वाजल्या पासून दुपारी 1 वाजेपर्यंत पोट दुखी, लिव्हरला सुज …
Read More »संजीव कांबळे यांनी स्वीकारला सीईएन पोलीस स्थानकाचा पदभार
बेळगाव : बेळगाव शहरातील सायबर, इकॉनॉमिक्स ऑफेन्स आणि नार्कोटिक्स अर्थात सीईएन पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक पदी संजीव कांबळे यांनी पदभार स्वीकारला आहे. मावळते पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी कांबळे यांना पदभार सोपवला. गड्डेकर यांची हेस्कॉम जागृत दलाचे पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. गेल्या दोन वर्षात गड्डेकर यांनी …
Read More »कामगार व शेतकर्यांच्या हक्कांसाठी संयुक्त लढा शेकापचे काम चालूच : अॅड. राजाभाऊ पाटील यांचे मत
बेळगाव : शेतकरी आणि कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी, त्यांना मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली. पण, सीमाभागात हा पक्ष महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यात सहभागी आहे. त्यामुळे पक्षाचे स्वतंत्र कामकाज होत नाही. पण, शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी संयुक्तरित्या लढा देण्याचे काम सुरूच आहे, असे मत अॅड. राजाभाऊ पाटील …
Read More »नक्षलवादाला खतपाणी घालणार्यांच्या विरोधातील वैचारिक लढाई जिंकणे आवश्यक! : अधिवक्ता रचना नायडू
कोल्हापूर : नक्षलवाद हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेला असलेला सर्वात मोठा धोका आहे. भारतीय सैन्य बिकट भौगोलिक परिस्थितीत बंदूकधारी नक्षलवाद्यांविरोधात सक्षमपणे लढतच आहेत; मात्र ही लढाई लढत असताना ‘ग्रामीण लोकांच्या हत्या केल्या’, ‘महिलांवर अत्याचार केले’, ‘मानवाधिकाराचे उल्लंघन केले जाते’, असा दुष्प्रचार जेव्हा भारतीय सैन्याविरोधात केला जातो, तेव्हा त्या वैचारिक लढाईत …
Read More »अवचारहट्टी येथील श्री विठ्ठलाईदेवी मंदिराचे चौकट पूजन
बेळगाव : अवचारहट्टी येथील श्री विठ्ठलाईदेवी मंदिराचे चौकट पूजन कार्यक्रम गुरूवारी करण्यात आला. ओबीसी मोर्चा राज्य सेक्रेटरी व सकल मराठा समाज संयोजक किरण जाधव आणि श्री. सोमनाथ धामणेकर यांच्या हस्ते चौकट पूजन करण्यात आले. श्री विठ्ठलाईदेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात आहे. आकर्षक असे मंदिर बनवण्यात येत आहे. या ठिकाणी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta