Saturday , March 7 2026
Breaking News

Belgaum Varta

खानापुरातील पोलीस कॉन्स्टेबलची मार्शल आर्ट्समध्ये भरारी

  खानापूर :खानापूर पोलिस स्थानकाचे कॉन्स्टेबल प्रकाश गाडीवड्डर यांनी नुकताच हरियाणा येथे झालेला राष्ट्रीय स्तरावरील मिश्र मार्शल आर्ट्समध्ये सुवर्ण पदक मिळविले आहे. त्याबद्दल नुकताच पोलिस स्थानकाच्या वतीने तसेच हलकर्णी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. गाडीवड्डर हे मूळचे गोकाका तालुक्यातील धुपदाळा येथील आहेत. शालेय वयापासूनच त्यांनी कराटे, बॉक्सिंग आणि इतर साहसी …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली रतन टाटांची भेट

  मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगपती रतन टाटा यांची आज भेट घेतली. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, रतन टाटा यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांची तब्येत ठीक आहे. निर्णयांच्या स्थगितीबाबत यावेळी त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, जी कामं ठाकरे सरकारच्या काळात शेवटच्या काळात घाईत …

Read More »

खानापूर निवृत्त शिक्षक संघाचा 30 रोजी वर्धापन दिन

  खानापूर : खानापूर तालुका मराठी प्राथमिक निवृत्त शिक्षक संघटनेचा 11वा वर्धापन दिन 30 जुलै 2022 रोजी ज्ञानेश्वर मंदिरात दुपारी 12 वाजता संपन्न होणार आहे यावेळी माहिती देताना संघटनेचे अध्यक्ष श्री. डी. एम. भोसले यांनी 85 वर्षेपूर्ण झालेल्या संघटनेच्या सभासदांचा सत्कार तसेच राज्यात मराठी माध्यमातून पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांचा व 90 …

Read More »

ईडीचे कारवाईचे अधिकार कायम; सुप्रीम कोर्टाने पीएमएलए कायद्याविरोधातील याचिका फेटाळली

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने पीएमएलए कायद्याविरोधात करण्यात आलेल्या याचिका फेटाळल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) कारवाईचे अधिकार कायम ठेवले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे केंद्र सरकारला दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टात पीएमएलए कायद्याविरोधात करण्यात आलेल्या २०० हून अधिक याचिका एकत्रित करत त्यावर सुनावणी घेण्यात आली. याचिकांमध्ये अटकेचे नियम, कारवाईचे …

Read More »

आप्पाचीवाडी येथे हायस्कूल इमारत शुभारंभ

  पालक वर्गातून समाधान : मंत्री शशिकला जोल्ले यांचे प्रयत्न कोगनोळी : आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथे मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या हायस्कूल इमारतीचा शुभारंभ मंत्री शशिकला जोल्ले व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाराम खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. …

Read More »

कर्नाटक भाजप युवा मोर्चाच्या नेत्याची हत्या

  बेंगलोर : दक्षिण कन्नडमधील सुळ्य तालुक्‍यातील बल्‍लारे येथे मंगळवारी रात्री उशिरा भाजप युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेट्टारू यांची दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्‍यक्‍तींनी प्राणघातक शस्‍त्रांनी वार करून हत्या केली. प्रवीण नेट्टारू हे रात्री दुकान बंद करून घरी जात असताना केरळ राज्यातील नोंदणीकृत दुचाकीवरून आलेल्या तिघांनी तलवारीने यांच्यावर हल्ला केला. हत्येची …

Read More »

गळा चिरून पोटच्या मुलाचा बापाकडून निर्घृण खून; पत्नी गंभीर जखमी

बेळगाव : गोकाक तालुक्यातील शिल्तीभावी गावच्या हद्दीतील एका ऊसाच्या शेतात बालेश अक्कनी (वय 4) या मुलाचा पित्याने गळा चिरून खून केल्याची घटना घडली. तर आई लक्ष्मी मतेप्पा अक्कनी (27) या गंभीर जखमी झाल्या. आरोपी मतेप्पा अक्कनी (28) याला पोलिसांनी अटक केली आहे. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले. …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

  मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 62 वा वाढदिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून माजी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून तसेच त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री …

Read More »

मध्यवर्ती म. ए. समितीकडून आम. चंद्रकांत पाटील यांचे सांत्वन

बेळगाव : महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यामुळे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी -सदस्यांनी मंगळवारी दुपारी कोल्हापूर मुक्कामी त्यांची भेट घेऊन सांत्वन केले. महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री सरस्वती बच्चू पाटील (वय 91) यांचे काल रविवारी सायंकाळी वृद्धापकाळाने संभाजीनगर, कोल्हापूर येथील निवासस्थानी निधन …

Read More »

आणखी एका संशयित दहशतवाद्याला तमिळनाडूत अटक

सीसीबी पोलिसांची कारवाई, दहशतवादी अख्तरच्या चौकशीतून माहिती समोर बंगळूर : सोशल मीडियाच्या माध्यमातून जिहाद युद्ध भडकविण्यासाठी प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली सीसीबी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित दहशतवाद्याने दिलेल्या माहितीवरून तामिळनाडूमध्ये आणखी एका संशयिताला अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्याला अधिक चौकशीसाठी बंगळूरात आणण्यात येत आहे. सीसीबी पोलिसांनी रविवारी रात्री बंगळुरमधील टिळक …

Read More »