Tuesday , December 16 2025
Breaking News

Belgaum Varta

मार्केट स्टॉलसाठी २० जून रोजी लिलाव

बेळगाव : कॅण्टोन्मेंट बोर्डाने आपल्या हद्दीतील बीफ, मटण आणि पोर्क मार्केटमधील स्टॉल भाडेतत्वावर देण्यासाठी लिलाव आयोजित केला आहे. एक वर्षाच्या मुदतीसाठी हा लिलाव असून २० जून रोजी सकाळी ११.३० वाजता होणार आहे. थकबाकीदारांना लिलावात सहभागी होता येणार नाही. स्टॉल्स हस्तांतरित केल्यापासून एक वर्षाच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर दिले जातील. लिलावात सहभागी होऊ …

Read More »

‘आम्ही देखील पाहून घेऊ’, अनिल परबांच्या घरांवरील ईडी छापेमारीवर संजय राऊतांचा इशारा

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी परिवहन मंत्री अनिल परब यांचे निवासस्थान तसेच त्यांच्याशी संबंधित एकूण सात ठिकाणांवर आज गुरुवारी ईडीने छापेमारी केली. या कारवाईवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही देखील पाहून घेऊ’, असा इशारा राऊतांनी दिला आहे. अनिल परब कडवट शिवसैनिक आहेत. त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई सुरु …

Read More »

कोगनोळी जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेबाबत अधिकाऱ्यांना पंकज पाटील यांच्या सक्त सूचना

कोगनोळी : येथील ग्रामपंचायतीसाठी कोट्यावधी रुपयेची जल जीवन मिशन योजनेचे काम सुरू आहे. दर्जेदार कामासंदर्भात माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी संबंधित कामाचे ठेकेदार व काम तपासणी अधिकारी यांना सक्तीच्या सूचना देऊन दर्जेदार काम होण्यासाठीचा पाठपुरावा करण्याचा आग्रह धरला. जल जीवन मिशन योजने अंतर्गत कोगनोळीमध्ये मुख्य रस्त्यासह गल्लोगल्ली खुदाई …

Read More »

काश्मीरमध्ये सोशल मीडिया स्टारची दहशतवाद्यांकडून गोळ्या घालून हत्या; १० वर्षाचा भाचा जखमी

जम्मू : जम्मू काश्मीरमधील बडगम जिल्ह्यात एका ३५ वर्षीय सोशल मीडिया स्टारची दहशतवाद्यांकडून गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यात महिलेचा १० वर्षाचा भाचा जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-तोयबाने हा हल्ला केला. “रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांना घरात घुसून अमरिन भटवर गोळीबार केला. जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात …

Read More »

शिवसेना नेते अनिल परब यांच्या घरावर ईडीची धाड; मुंबई, पुणे आणि रत्नागिरीत कारवाई सुरु

मुंबई : शिवसेना नेते अनिल परब यांच्या वांद्र्यातील घरावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) धाड टाकली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने ही धाड टाकली असून मुंबईसोबतच पुणे आणि रत्नागिरीमधील ठिकाणांचीही पाहणी केली जात आहे. ईडीचे अधिकारी सकाळी अनिल परब यांच्या वांद्रे येथील घरी आणि मरिन ड्राईव्हमधील सरकारी निवासस्थानी दाखल झाले आहेत. यासोबत …

Read More »

आमदार अनिल बेनके यांची भाजप महानगर अध्यक्षपदी नियुक्ती

बेळगाव : बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांची भाजप महानगर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कर्नाटक प्रदेश भाजप अध्यक्ष नलीन कुमार कटील यांनी उत्तर आमदारांना भाजप अध्यक्ष बनवण्याचा आदेश बजावला आहे. वायव्य कर्नाटक पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार हणमंत निराणी आणि अरुण शहापूर यांचा उमेदवारी अर्ज आज …

Read More »

एलिमिनेटर सामन्यात बंगळुरुचा लखनऊवर थरारक विजय, क्वॉलिफायर-२ मध्ये

कोलकाता : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेमध्ये आज एलिमिनेटर लढत खेळवली गेली. लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघांमध्ये खेळवलेल्या गेलेल्या सामन्यात बंगळुरूने बाजी मारली आहे. बंगळुरूने लखनऊच्या संघाचा १४ धावांनी पराभव करत क्वॉलिफायर २ मध्ये प्रवेश केला आहे. तर आजच्या पराभवामुळे लखनऊ सुपर जायंट्सचे …

Read More »

विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक जाहीर; 20 जूनला मतदान

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीपाठोपाठ आता विधान परिषदेची निवडणुकही रंगत आणणार आहे. निवडणूक आयोगाकडून देशातील उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार या तीन राज्यांतील विधानपरिषदेच्या निवडणूक कार्यक्रमाची बुधवारी घोषणा केली. या तीनही राज्यातील एकूण …

Read More »

चारधाम यात्रेसाठी निघालेल्या गाडीत सिलिंडरचा स्फोट; ६ जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये बुधवारी (ता. २५) चारधाम यात्रेसाठी जाणाऱ्या सहा प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला. टिहरी जिल्ह्याजवळ हा अपघात झाला. प्रवाशांनी स्वयंपाकासाठी गाडीत गॅस सिलिंडर ठेवला होता. सिलिंडरमध्ये स्फोट झाल्याने हा अपघात झाला, अशी माहिती टिहरीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिली आहे. अपघातात प्राण गमावलेले सर्व प्रवासी हे पश्चिम बंगालचे असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राप्त …

Read More »

ओडीसातील भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू; 40 हून अधिक जखमी

भुवनेश्वर : ओडीशाच्या गंजाम गावामध्ये मंगळवारी रात्री झालेल्या भीषण बस अपघातात सहा लोकांचा मृत्यू झाला, तर चाळीसहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, हा अपघात बसचा ब्रेक निकामी झाल्याने किंवा बसचा चालक नवीन असल्याने झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या …

Read More »