Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

तालुका, जिल्हा पंचायत अस्तित्वअभावी गैरसोय

  राजेंद्र वडर : अनेक कामावर परिणाम निपाणी (वार्ता) : गेल्या सव्वा वर्षांपासून तालुका आणि जिल्हा पंचायत अस्तित्वात नसल्याने जिल्हा पंचायत अधिकार्‍यांवर अंकुश ठेवण्यासाठी कोणी नाही. त्यामुळे नागरिकांचे कोणतेही काम होत नसल्याने निवडणुकीबाबत ताबडतोब निर्णय घेण्याची मागणी माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर यांनी केली आहे. वडर म्हणाले, ग्राम पंचायत, …

Read More »

संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ

  मुंबई : पत्राचाळ मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज पुन्हा पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. यापूर्वी न्यायालयाने संजय राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यापूर्वी ते ईडी (सक्तवसुली संचालनालय) कोठडीत होते. …

Read More »

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोहीम तीव्र

  बेळगाव : बेळगावातील हिंडलगा रोडवर (वनिता विद्यालयाजवळ) आज सकाळी बिबट्या दिसल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस व वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोहीम तीव्र केली. आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन कारवाईची माहिती घेतली. पोलिस उपायुक्त रवींद्र गडाडी आदी उपस्थित होते.

Read More »

गोल्फ कोर्स परिसरातील “त्या” शाळांना आज सुट्टी

  बेळगाव : आज सकाळी साधारण 6.30 च्या दरम्यान गोल्फ कोर्स परिसरात बिबट्या दिसल्याने परिसरातील 22 शाळांना तातडीने सुट्टी जाहीर केली. शिक्षण विभागाचे उपसंचालक बसवराज नलतवाड यांनी सांगितले की, बिबट्या दिसल्याने बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातील २२ प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना सोमवारी (२२ ऑगस्ट) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Read More »

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर उद्या सुनावणी

नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावर आज होणारी सुनावणी आता आणखी लांबणीवर पडली आहे. मागील सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी २२ ऑगस्ट रोजी होईल असं सांगितल होतं. मात्र, आज होणारी सुनावणी २३ ऑगस्टला होणार आहे. त्रिसदस्यीय खंडपीठातले एक न्यायमूर्ती आज उपलब्ध नसल्यामुळे ही सुनावणी लांबणीवर गेल्याचे सांगण्यात आले आहे. निवडणूक आयोगाची …

Read More »

शिरगुप्पीजवळील मुळवाड येथे बिबट्याचे दर्शन

मुळवाड : बेळगाव जिल्ह्यात आणखी एक बिबट्या आढळून आला असून संपूर्ण जिल्ह्यात बिबट्याची दहशत वाढली आहे. कागवाड तालुक्यातील शिरगुप्पीजवळील मुळवाड येथील शेतात रविवारी सायंकाळी बिबट्या दिसला. प्रशांत पाटील नावाचा शेतकरी शेतात गेल्यावर बिबट्याला पाहून घाबरून पळून आला. शेतकऱ्याने येऊन सांगितल्यानंतर गावकऱ्यांनी जाऊन खात्री केली असता तिथे पायाचे ठसे आढळून आले. …

Read More »

मडिकेरी २६ ला ठरणार कॉंग्रेस-भाजपचे रणांगण

अंडीफेक वाद वाढला; कॉंग्रेसची ‘मडिकेरी चलो’ची हाक, भाजपची जनजागृती बैठक बंगळूर : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या गाडीवर अंडी फेकल्याच्या प्रकरणाने गंभीर स्वरूप धारण केले असून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अंडी फेकल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘मडिकेरी चलो’ची हाक दिली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपनेही पलटवार केला असून मडिकेरी जिल्हा भाजप युनिटने …

Read More »

सार्वजनिक वाचनालय आयोजित भजन स्पर्धा उद्यापासून

बेळगाव : बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने श्रावण मासानिमित्त सोमवार दिनांक 22 ऑगस्टपासून आयोजित केलेल्या संगीत भजन स्पर्धेला उद्या प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन संत साहित्याचे अभ्यासक ह.भ.प. एस. बी. ओऊळकर यांच्या हस्ते दुपारी 3 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड रेल्वे ओव्हर ब्रिज येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी …

Read More »

बेळगावातील सार्वजनिक गणेश मंडपात वीर सावरकरांचे भावचित्र लावावेत : आमदारांची सूचना

  बेळगाव : काँग्रेसने सावरकरांची प्रतिमा लावण्यास विरोध दर्शविल्यानंतर भाजप आता गणेशोत्सवात सावरकरांचे भावचित्र लावण्यास पुढे सरसावला आहे. बेळगावातही सावरकरांचे चित्र लावण्याचा मुद्दा सध्या गाजत आहे. काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवादरम्यान सर्व गणेश मंडळांमध्ये सावरकरांची प्रतिमा लावण्याचा निर्धार करण्यात आला आहे. याच मुद्द्यावर बेळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार अभय यांनी गणेशोत्सवादरम्यान …

Read More »

हिंदु सणांच्या वेळी कायद्याचा गैरवापर करणार्‍या अधिकार्‍यांना निलंबित करा!

सहसंचालक डॉ. वि. मो. मोटघरे यांचे लिखित स्वरूपात उत्तर देण्याचे आश्वासन केवळ हिंदु सणांच्या वेळी प्रदूषणविरोधी कायद्याचा गैरवापर करुन हिंदूंशी पक्षपात करणार्‍या ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या सर्व संबंधित अधिकार्‍यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांची शीव (मुंबई) येथील कार्यालयात भेट घेतली. …

Read More »