Friday , March 6 2026
Breaking News

Belgaum Varta

खानापुरचे विनायक पत्तार यांचा यशस्वी उद्योजक म्हणून गौरव

बेळगाव : सकाळ माध्यम समुहाच्यावतीने गुरुवार दि. २९ रोजी बेळगावातील यशस्वी उद्योजकांबरोबर अनेक अडचणींचा सामना करत मुलांना यशस्वी केलेल्या मातांचा गौरव करण्यात आला. हॉटेल सयाजीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अभिनेत्री धनश्री कडगावकर हे मुख्य आकर्षण होते. सायंकाळी यशस्वी उद्योजकांचा गौरव करण्यात आला. यावेळी खानापूरचे सराफ विनायक पत्तार यांना बेस्ट …

Read More »

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

 देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मुंबई : 2019 च्या निवडणुकीत भाजप शिवसेना असे युतीची निवडणूक झाली होती. भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या.त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचा मुख्यमंत्री होईल असे स्पष्टपणे सांगितले होते.मात्र शिवसेना नेत्यांनी हिंदूत्वाला नेहमीच विरोध करणाऱ्यांशी संगणमत करून सत्ता स्थापन केले. भाजपने हाती घेतलेल्या अनेक …

Read More »

धक्कादायक! ऑटोवर विजेची तार पडली; 7 जणांचा होरपळून मृत्यू, एक गंभीर

सत्यसाई : आंध्र प्रदेशातील सत्यसाई जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी हाय टेंशन वायर पडल्याने एका ऑटोला आग लागली. शेतात कामाला जाणारे कामगार या ऑटोमध्ये बसले होते. यापैकी 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ड्रायव्हर आणि इतर 5 प्रवाशांनी ऑटोतून उडी मारून आपला जीव …

Read More »

राज्याच्या विकासासाठी सत्तांतराचा सुर्योदय महत्वाचा : आनंद रेखी

शिवसेना पक्षप्रमुखांनी शुभाशिर्वादासह सरकारच्या पाठीशी राहण्याचे आवाहन मुंबई : महाराष्ट्रात तब्बल अडीच वर्षानंतर झालेल्या सत्तांतराचा सुर्योदय विकासाची नवीन उर्जा घेवून आलेला आहे, असे ठाम मत भाजप नेते आनंद रेखी यांनी गुरूवारी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमुळे राज्याचा रखडलेल्या विकासासाठी भाजप-शिवसेना सत्तेत येणे आवश्यक होतेच, अशी भावना देखील यानिमित्ताने त्यांनी …

Read More »

फडणवीस मुख्यमंत्री तर शिंदे उपमुख्यमंत्री? आज संध्याकाळी सात वाजता होणार शपथविधी, सूत्रांची माहिती

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. भाजपकडून सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. आज संध्याकाळी सात वाजता भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस …

Read More »

बेळगावात हिंदुत्ववादी संघटनांचा कन्हैयालाल हत्येच्या निषेधार्थ निदर्शने

बेळगाव : समाजमाध्यमांवर नुपूर शर्मांचे समर्थन केल्याबद्दल राजस्थानातील उदयपूर येथे हिंदू टेलर कन्हैयालाल याची हत्या केल्याच्या निषेधार्थ बेळगावात हिंदुत्ववादी संघटनांनी आज रास्ता रोको करून जोरदार निदर्शने केली. मोहम्मद पैगंबरांचा अवमान करणार्‍या भाजपच्या पूर्वाश्रमीच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केलेल्या उदयपूर येथील हिंदू टेलर कन्हैयालाल यांची धर्मांधांनी नुकतीच तलवारीने गळा चिरून …

Read More »

भूस्खलनात लष्कराचा तळ उध्वस्त; 55 जवान दबले, 7 जणांचा मृत्यू

इम्फाळ : मुसळधार पावसामुळे मणिपूरमध्ये भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. यात घटनेत लष्कराचा एक कॅम्प मातीच्या ढिगार्‍याखाली दबला गेल्याचे सांगितले जात असून, आतापर्यंत दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. मातीच्या ढिगार्‍याखाली अद्यापही अनेकजण दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत 19 जणांना वाचवण्यात यश आले असून, गंभीर जखमींना …

Read More »

खानापूर भाजपच्या वतीने रॅलीचे आयोजन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजपच्या वतीने राज्यात गेली आठ वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्कृष्ट राज्य कारभाराबद्दल यशस्वीतेचे ८ वर्ष  साजरे करण्यात आले. यानिमित्ताने खानापूर येथील शिवस्मारक चौकात रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिवस्मारक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला बेळगाव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेते व माजी …

Read More »

उद्यमबाग येथे एकाची निर्घृण हत्या

बेळगाव : धारदार हत्याराने वार करून युवकाची निर्घृण हत्या केल्याची घटना बेळगावातील उद्यमबाग येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. बेळगावातील मजगाव येथील आंबेडकर गल्लीतील रहिवासी २७ वर्षीय युवक यल्लप्पा शिवाजी कोलकार असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तीक्ष्ण हत्याराने भोसकून …

Read More »

शाहूनगर येथे एकाची गळफास लावून घेऊन आत्महत्या

बेळगाव : साई कॉलनी मेन रोड शाहूनगर येथे एका व्यक्तीने तीन मजली इमारतीला गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव शिवाजी जक्कप्पा बिर्जे (वय 65) असून ते जेएनएमसी येथे वॉचमेनचे काम करत होते. घटनास्थळी एपीएमसी पोलीस जाऊन घटनेचा पंचनामा केला. अद्याप आत्महत्येचे कारण …

Read More »