Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

उत्तर प्रदेश सरकारचे मुंबईत कार्यालय, योगी सरकारचा मोठा निर्णय

लखनौ : मुंबईत राहणार्‍या उत्तर प्रदेशातील रहिवाशांच्या हितासाठी उत्तर प्रदेश सरकारने मुंबईत कार्यालय उघडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. नोकर्‍या आणि इतर सुविधांकडे लक्ष देण्याचा यामागे उद्देश आहे. कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरितांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईतील कार्यालय महाराष्ट्रात …

Read More »

हिंडलगा येथे शिवशाहीर पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न

हिंडलगा : श्री महालक्ष्मी नगर हिंडलगा येथे शिवजयंतीनिमित्त शिवशाहीर पोवाडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाहीर वेंकटेश देवगेकर यांनी त्यांच्या पोवाड्याने सर्वांना शिवशृष्टी अनुभूती करून दिली. हा कार्यक्रम श्रीरामसेना हिंडलगा व युवक मंडळाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष संजय पाटील, भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष …

Read More »

गुजरात-लखनऊ आज आमनेसामने!

दोन्ही संघांना बाद फेरीतील स्थान निश्चितीची संधी पुणे : गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या गुणतालिकेतील अव्वल दोन संघ मंगळवारी आमनेसामने येणार आहेत. या दोन्ही संघांना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर होणारा हा सामना जिंकून बाद फेरीतील स्थान निश्चित करण्याची संधी मिळणार आहे. गुजरात …

Read More »

व्हीडीआयटीचा स्थापना दिन उद्या

बेळगाव : कर्नाटक लॉ सोसायटी संचालित विश्वनाथराव देशपांडे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा (व्हीडीआयटी) स्थापना दिन 11 मे रोजी दुपारी 3 वाजता संस्थेच्या आवारात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्हीटीयूचे कुलगुरु डॉ. करिसिद्धाप्पा तर निमंत्रित म्हणून सोसायटीचे विश्वस्त आर. व्ही. देशपांडे, व्हीटीयूचे कुलसचिव डॉ. ए. एस. देशपांडे, डॉ. बी. …

Read More »

व्यावहारिक जगामध्ये गणिताला सर्वोच्च स्थान : प्रा. डॉ. मंदाकिनी मुचंडी

बेळगाव : आजच्या युगात प्रत्येक विद्याशाखेत गणित हा मूलभूत विषय आहे. कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल, इंजिनिअरिंग, मेडिकल या सर्व क्षेत्रात गणित महत्त्वाचे आहे. केवळ अभ्यासात नव्हे तर व्यावहारिक जगामध्ये गणिताला सर्वोच्च स्थान आहे. त्यामुळे गणिताला सर्व विषयाची राणी म्हणतात, असे प्रतिपादन प्रा. डॉ. मंदाकिनी मुचंडी यांनी केले. मराठा जागृती निर्माण संघातर्फे …

Read More »

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे बेळगावात आगमन; गोगटे कुटुंबियांचे केले सांत्वन

बेळगाव : माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मंगळवारी सकाळी बेळगावात आगमन झाले. आपल्या दोन दिवसीय दौर्‍यात जिल्ह्यातील विविध कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे दोन दिवसीय दौर्‍यावर बेळगावात आज सकाळी आगमन झाले. उद्योगपती अरविंद गोगटे यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गोगटे …

Read More »

संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे निधन

नवी दिल्ली : संतूर या वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून देणारे जगद्विख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे निधन झाले आहे. आज 10 मे रोजी त्यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराने आज सकाळी त्यांचे निधन झाले. पंडित शिवकुमार हे 84 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी मनोरमा आणि पुत्र राहुल शर्मा …

Read More »

कोलकाता नाईट रायडर्सचा मुंबई इंडियन्सवर 52 धावांनी आकर्षक विजय

मुंबई : भेदक गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने अखेर यशाची चव चाखली असून सोमवारी त्यांनी मुंबई इंडियन्सवर 52 धावांनी आकर्षक विजय संपादला. त्यामुळे अकरा सामन्यांतून कोलकाताचे 10 गुण झाले असून त्यांच्यासाठी हा विजय दिलासादायक ठरला आहे. त्याचवेळी मुंबईला नववा पराभव पत्करावा लागला आहे. त्यांचे अकरा सामन्यांतून 4 गुण झाले आहेत. …

Read More »

गुरुवंदना कार्यक्रमाची मुहूर्तमेढ उत्साहात

छत्रपती संभाजीराजे यांची उपस्थिती बेळगाव : दि. 15 मे रोजी सकल मराठा समाजातर्फे होऊ घातलेल्या गुरुवंदना कार्यक्रमाची मुहूर्तमेढ आज दि. 9 मे रोजी सायंकाळी आदर्श विद्या मंदिराच्या पटांगणावर करण्यात आली. समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या हस्ते महूर्तमेढ करण्यात आली. यावेळी शंकर बाबली यांनी पौरोहित्य केले. गुरुवंदना कार्यक्रमासाठी आदर्श विद्या मंदिराच्या पटांगणावर भव्य …

Read More »