बेळगाव : बेळगाव शहरातील कपिलेश्वर कॉलनी येथून घरासमोर लावलेली अॅक्टिव्हा दुचाकी चोरीला गेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. चोरीला गेलेली अॅक्टिव्हा दुचाकी कपिलेश्वर कॉलनी येथील प्रतिष्ठित नागरिक श्रीकांत देसुरकर यांच्या मालकीची आहे. काल मंगळवारी रात्री देसुरकर यांनी आपली अॅक्टिव्हा (क्र. केए 22 …
Read More »वायव्य पदवीधर मतक्षेत्रातील भाजपा उमेदवार हनमंत निराणी यांच्या प्रचारार्थ पूर्वतयारी बैठक संपन्न
बेळगाव : वायव्य पदवीधर मतक्षेत्रातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री. हनमंत निराणी यांच्या प्रचारार्थ निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ कार्यालयमध्ये बैठक संपन्न झाली. याप्रसंगी हनमंत निराणी म्हणाले, मागच्या वेळेला तुम्ही सर्वांनी प्रयत्न करून मोठ्या मताधिक्क्याने निवडून दिला आहात. पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून आणखी एक संधी दिली आहे. तेव्हा …
Read More »निपाणीत ’नरेंद्र चषक’ फुटबॉल स्पर्धा 24 पासून
दिवंगत नितीन शिंदे जयंतीचे निमित्त : शिंदे परिवारातर्फे आयोजन निपाणी (वार्ता) : येथील निपाणी फुटबॉल अकॅडमीचे सदस्य दिवंगत नितीन शिंदे यांच्या स्मरणार्थ मंगळवारपासून (ता.24) नरेंद्र चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. शिंदे परिवाराच्या सहकार्याने निपाणी फुटबॉल अॅकडमीतर्फे समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर साखळी पद्धतीने या स्पर्धा होणार असून विजेत्या संघांना …
Read More »पोलीस बंदोबस्तात गव्हाणमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम
तहसीलदारांची उपस्थिती : अनेक ठिकाणची अतिक्रमणे हटवली निपाणी (वार्ता) : पट्टणकुडी ते गव्हाण हा रस्ता बर्याच वर्षांपूर्वी मंजूर झाला होता. पीएमआरवाय योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम होणार होते. रस्त्याचे प्रत्यक्ष कामकाज सुरू झाल्यावर गव्हाण येथील काही नागरिकांनी या रस्त्याच्या कडेला अतिक्रमण केले होते. संबंधित अतिक्रमण काढून घेण्यासाठी प्रशासनातर्फे त्यांना नोटीस पाठवण्यात …
Read More »ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणासंदर्भात बेळगावमध्ये आंदोलन
बेळगाव : ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षणादरम्यान सापडलेल्या शिवलिंगासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात आज बेळगावमध्ये एसडीपीआय कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडत जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर केले. ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षणादरम्यान विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात आला आहे. मात्र हा दावा खोटा असल्याचे मुस्लिम पक्षाचे म्हणणे असून आज बेळगावमध्ये यासंदर्भात एसडीपीआय संघटनेने आंदोलन छेडले होते. यावेळी …
Read More »शिग्गावी येथील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला शेतकर्यांचा घेराव
बेळगाव : शेतकर्यांच्या पिकाला योग्य हमीभाव मिळावा, शेतकर्यांच्या विविध समस्या सोडवाव्या या मागण्यांसाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या शिग्गावी येथील कार्यालयाला शेतकर्यांनी घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे. राज्यातील शेतकर्यांसमोर अनेक समस्या उभ्या आहेत. शेतकर्यांनी पिकविलेल्या पिकाला योग्य भाव मिळत नाही. शेतकर्यांची वीज समस्या सुटत नाही. परंतु …
Read More »भवानीनगर येथील बांधकाम व्यवसायिकाच्या हत्येप्रकरणी समाजसेवक मधू कलंत्री ताब्यात
बेळगाव : भवानीनगर येथे झालेल्या बांधकाम व्यवसायिकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत. त्यामुळे या खून प्रकरणाचा मास्टरमाइंड असणार्या शहापूर येथील समाजसेवक मधू कलंत्री याला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे वृत्त हाती आले आहे. समाजसेवेच्या पडद्याआडून खुनाचे कारस्थान करणार्या या कुतंत्री व्यवसायिकाची माहिती पोलिस यंत्रणेने अधिकृतरित्या जाहीर केलेली नाही. मूळचा हलगा …
Read More »बेळगाव रेल्वे स्थानकाला क्रांतिवीर सिंधूर लक्ष्मण यांचे नाव द्यावे
बेळगाव : बेळगाव शहर रेल्वे स्थानकाला क्रांतिवीर सिंधूर लक्ष्मण यांचे नाव देण्यात यावे, रेल्वे स्थानकाबाहेर सिंधूर लक्ष्मण यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी बेळगावमधील कर्नाटक अनुसूचित जाती वाल्मिकी राज्य युवा घटक आणि अभिमानी संघाने केली आहे. बुधवारी क्रांतिवीर सिंधूर लक्ष्मण यांच्या जयंतीनिमित्त बेळगावमधील कर्नाटक अनुसूचित जाती वाल्मिकी राज्य युवा घटक …
Read More »प्रभागाच्या विकासासाठी निवडणूक रिंगणात : शिवानंद मुडशी
संकेश्वर (महंमद मोमीन) : प्रभाग 13 चा सर्वांगिण विकास साधण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. त्यामुळे प्रचारात मतदारांचा वाढता पाठिंबा मिळाल्याचे भाजपाचे उमेदवार शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते नगरसेवक रोहण नेसरी यांच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले प्रभाग 13 चे दिवंगत नगरसेवक, आमचे स्नेही संजय …
Read More »कारखान्याची भिंत कोसळून 12 जणांचा मृत्यू
गुजरातमधील दुर्देवी घटना अहमदाबाद : गुजरातमधील मोरबी येथील हळवद जीआयडीसी येथे मीठ कारखान्याची भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजून तीन जण अडकल्याची भीती आहे. अपघाताच्या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. गुजरातमधील मोरबी येथे असलेल्या मीठ कारखान्याची भिंत बुधवारी कोसळली. भिंत कोसळल्याने कारखान्यात काम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta