Tuesday , December 16 2025
Breaking News

Belgaum Varta

बेळगावमध्ये ऐतिहासिक भीमा कोरेगाव विजयोत्सवाचे आयोजन

बेळगाव (वार्ता) : बेळगावमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात ऐतिहासिक भीमा कोरेगाव विजयोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विविध दलित संघटनांचे नेते सहभागी झाले होते. यावेळी भीमा कोरेगाव लढ्याच्या …

Read More »

’चंदगड’ मधील किल्ले, धार्मिक व नैसर्गिक स्थळे पर्यटकांना आकर्षित करण्यास सक्षम : प्रांताधिकारी वाघमोडे

पारगड परिसराची अधिकार्‍यांकडून पाहणी, चंदगड पत्रकार संघाचा पुढाकार चंदगड (श्रीकांत पाटील) : चंदगड मधील ऐतिहासिक गडकोट, नैसर्गिक साधन संपत्ती, धार्मिक स्थळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सक्षम आहेत. त्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्याची गरज असून तालुक्यातील अशा ठिकाणांची पाहणी करून त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती गडहिंग्लजचे उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी दिली. …

Read More »

अपघातात जुने बेळगावचा युवक ठार

बेळगाव : दुचाकी दुभाजकाला आदळल्याने झालेल्या अपघातात एक युवक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बी. एस. येडीयुरप्पा रोडवर घडली आहे. शुक्रवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान जुने बेळगाव नाक्याजवळ ओल्ड पी. बी. रोडवर हा अपघात झाला आहे. ओमकार लक्ष्मण गडकरी (वय 19) रा. लक्ष्मी गल्ली जुने बेळगाव असे …

Read More »

नूतन पोलीस आयुक्तांनी स्वीकारला पदभार

बेळगाव : बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांची तडकाफडकी बेंगलोरला बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी पोलीस आयुक्त म्हणून डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची नेमणूक करण्यात आली आहे. नूतन पोलीस आयुक्त म्हणून आज शनिवारी सायंकाळी डॉ. बोरलिंगय्या यांनी आपल्या अधिकार पदाची सूत्रे स्वीकारली. नव्या पोलीस आयुक्तांवर सर्वात मोठी जबाबदारी …

Read More »

बेळगावच्या जवानाचा राजस्थानमध्ये अपघाती मृत्यू

खानापूर : राजस्थानमधील मद्रास रेजिमेंटच्या मिलिटरी कॅम्प येथे काल शुक्रवारी रात्री झालेल्या रस्ते अपघातात बेळगाव तालुक्यातील इदलहोंड गावाचे जवान बाळाप्पा तानाजी मोहिते (वय 32) हे मृत्युमुखी पडले. अलीकडेच हवालदार हुद्यावर बढती मिळालेल्या मयत बाळाप्पा मोहिते यांची राजस्थान येथील मद्रास इंजीनियरिंग रेजिमेंट येथे पोस्टिंग झाली होती. काल शुक्रवारी रात्री आपले कर्तव्य …

Read More »

‘अंकुर’तर्फे गतिमंद मुलांसाठी 24 ते 26 विविध स्पर्धा

बेळगाव : शहरातील अंकुर स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रन या शाळेतर्फे सावित्रीबाई फुले समितीच्या सहयोगाने येत्या 24 ते 26 जानेवारी 2022 या कालावधीमध्ये गतिमंद मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले उद्यान, गुरुवार पेठ (मिलेनियम गार्डन समोर), टिळकवाडी येथे या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. गतिमंद मुलांसाठी (स्पेशल चाईल्ड) नृत्य …

Read More »

सिंगीनकोप, गर्लगुंजी भागात वीट व्यवसायाला प्रारंभ

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा वीट व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. खानापूर तालुक्यातील वीट बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे याभागातील गर्लगुंजी, इदलहोंड, सिंगीनकोप, गणेबैल, अंकलेसह नंदगड, हेब्बाळ, शिवोली, चापगाव अशा विविध भागात वीट व्यवसाय मोठ्याप्रमाणात चालतो. यासाठी डिसेंबर ते एप्रिलपर्यंत वीट व्यवसाय केला जातो. परंतु यंदा अवकळी पाऊस डिसेंबरपर्यंत झाला. त्यामुळे जमिनीत …

Read More »

यमकनमर्डीत भिमाकोरेगांव विजयोत्सव : उमेश भिमगोळ

संकेश्वर (प्रतिनिधी) : येत्या ३ जानेवारी २०२२ रोजी दुपारी ३ वाजता यमकनमर्डी येथे भिमाकोरेगांव विजयोत्सव आणि सावित्रीबाई फुले जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यमकनमर्डीचे दलितनेते उमेश भिमगोळ यांनी आज सायंकाळी विश्रामधाम येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले कार्यक्रमाला जेवरगी सिध्द बसव कबीर स्वामीजींचे दिव्य सानिध्य लाभणार आहे. …

Read More »

हलशीत भाताच्या गंजीला आग, ३० पोती भाताचे नुकसान

खानापूर (प्रतिनिधी) : हलशीतील (ता. खानापूर) गावचा सर्वे नंबर ३/१ मधील कक्केरी शेतात शुक्रवारी दि. ३१ डिसेंबर रोजी मध्य रात्री अज्ञातानी भाताच्या गंजीला आग लावल्याची घटना घडली. याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, हलशी (ता. खानापूर) येथील शेतकरी नामदेव सोमू गुरव यांच्या सर्वे नंबर ३/१ मधील कक्केरी शेतात साठून ठेवलेल्या …

Read More »

धर्मांतरण आरोप; बागलकोटमधील शाळा बंद करण्याचा आदेश, माघार

शिक्षणाधिकाऱ्यांचा तुघलकी कारभार बंगळूर : बागलकोट जिल्ह्यातील हुंगुंडजवळील इल्कल येथील सेंट पॉल उच्च प्राथमिक शाळा बंद करण्याचा आदेश जारी करण्यात आला. ‘विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या आरोपावरून शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. परंतु अद्याप कायदा जारी झाला नसल्याची जाणीव होताच त्यांनी आदेश मागे घेतला. परंतु …

Read More »