खानापूर : बेळगाव-गोवा महामार्गावरील मलप्रभा नदी पुलावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील साईड पट्टीवर दुचाकी धडकल्यामुळे डोकीला जबर मार बसल्याने एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज शनिवार दिनांक 14 जून 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील भातकांडे गल्ली नंदगड …
Read More »२७ वर्षांची प्रतीक्षा संपली अन् दक्षिण आफ्रिका ठरला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन!
लॉर्ड्स : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये रंगला. पाच दिवसांचा कसोटी सामना चौथ्या दिवशीच संपला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टेम्बा बावुमाच्या नेतृत्वामध्ये पहिल्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली आहे. तब्बल २७ वर्षांनी त्यांनी दुसरी आयसीसी ट्रॉफी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कमावली आहे. इंग्लंडमधील …
Read More »सीमाभागातील मराठी पत्रकारांच्या हितासंदर्भात चर्चा!
बेळगाव : आज शनिवार दि. १४ रोजी बेळगाव मिडिया असोसिएशनची बैठक श्री शंभू जत्तीमठ येथे घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्रीकांत काकतीकर उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी संघटनेच्या सदस्या अरुणा गोजे- पाटील यांचे सासरे प्रभाकर नारायण गोजे -पाटील त्याचबरोबर अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मरण पावलेल्या सर्वांना स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. …
Read More »जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शाळा क्र. 5 च्यावतीने जनजागृती फेरी
बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून चव्हाट गल्ली येथील मराठी शाळा व माजी विद्यार्थी संघाच्या वतीने पर्यावरणाचे महत्व आणि मराठी शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासंदर्भात चव्हाट गल्लीत जागृती फेरी काढण्यात आली शाळेच्या आवारात जागृती फेरीचे उद्घाटन माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दीपक किल्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी …
Read More »अथणीहून दावणगेरेला निघालेल्या बस आणि कारचा भीषण अपघात: दोघांचा जागीच मृत्यू
अथणी : बस आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. हावेरी जिल्ह्यातील राणेबेन्नूर तालुक्यातील कुमारपट्टणम गावाच्या बायपासजवळ ही दुर्घटना घडली. मृतांची ओळख प्रवीण (३६) आणि विजय अशी झाली आहे, जो मूळचा दावणगेरे येथील आहे. या घटनेत आणखी दोघे गंभीर जखमी झाले आहेत. बस अथणीहून दावणगेरेला जात होती. …
Read More »संतापलेल्या भावानेच केली मोठ्या भावाची हत्या!
बेळगाव : कामावर जाण्याचा सल्ला दिल्याने संतप्त झालेल्या लहान भावाने आपल्याच मोठ्या भावाची गुप्तपणे हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण यमकनमर्डी पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उघडकीस आणले आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असल्याची माहिती बेळगावचे एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली. आज बेळगाव …
Read More »विमान अपघाताचा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात; प्राथमिक चौकशी होणार
अहमदाबाद : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाल्यानंतर काही वेळातच या अपघाताचा एक व्हिडीओ समोर आला होता. यामध्ये विमान नागरी वस्तीच्या अगदी जवळून गेल्याचे आणि काही वेळात कोसळल्याचे स्पष्ट दिसत होते. व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्याने विमान अपघाताची वेळ इतकी अचूक कशी काय साधली? याबाबत सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले …
Read More »पाळीव कुत्र्यानेच घेतला मालकाचा चावा..!
बेळगाव : स्वतःच्याच पाळीव कुत्र्याने मालकावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना कंग्राळी खुर्द येथे घडली आहे. कंग्राळी खुर्द येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त सुभेदार पुंडलिक गौंडवाडकर गेल्या अनेक वर्षांपासून घरात रॉटवायलर जातीचे कुत्रे पाळत होते. ते त्याला लहान मुलासारखेच सांभाळत होते आणि कुटुंबातील सदस्य म्हणूनच त्यांनी त्याला वाढवले होते. नेहमी …
Read More »सुळगा (हिंडलगा) येथे शेडमध्ये गवंडी कामगाराचा गळा आवळून खून
बेळगाव : सुळगा (हिंडलगा) येथील एका शेडमध्ये एका गवंडी कामगाराचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.।खानापूर तालुक्यातील गस्टोळी दड्डी (ता. खानापूर) येथील हा गवंडी कामगार असून शुक्रवारी सकाळी खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे. कुबेर देमाण्णा दळवाई (वय 36 वर्ष) राहणार गस्टोळी दड्डी असे खून झालेल्या व्यक्तीचे …
Read More »राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी येथे नूतन शैक्षणिक कक्ष, क्रीडा भवन आणि स्वच्छतागृहाचे उद्घाटन
खानापूर : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा शाळा स्थापन करण्याच्या पाठीमागचा उद्देशच हा आहे की प्रत्येक विद्यार्थी हा शिकला पाहिजे तो शिक्षित झाला पाहिजे आणि त्यासाठी त्याला जे जे काही हवे असेल ते प्राप्त करून देण्यासाठी या समाजातील सेवाभावी संस्था नेहमी तत्पर असतात आणि त्यानी आपल्या या संस्थेतील शाळेसाठी जे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta