Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

अंतर्गत सुरक्षा, गुप्तचर विभागात निवड झाल्याने निकिता कांबळे हिचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : ममदापूर येथील निकिता अनिल कांबळे हिची अंतर्गत सुरक्षा व गुप्तचर विभागात निवड झाल्याबद्दल तिचा सत्कार सोहळा पार पडला झाला. या सोहळ्यास सहकार रत्न उत्तम पाटील यांनी उपस्थित राहून निकिताचा सत्कार केला. अमोल आवटे यांनी‌ स्वागत केले. उत्तम पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील मुलींनी शिक्षणाच्या माध्यमातून मोठ्या पदांवर …

Read More »

लोकप्रतिनिधी, आयुक्तांच्या गलथान कारभारामुळेच घरकुल प्रश्नी गोंधळ

  बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे; रक्कम भरलेल्यांना घरकुल मिळणारच निपाणी (वार्ता) : राजीव गांधी घरकुल आणि प्रधानमंत्री आवास योजनेत येथील १८१२ लाभार्थ्यांची यादी आहे. ही यादी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि माजी आमदार दिवंगत काकासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने राजकारण विरहित केली आहे. पण लोकप्रतिनिधींच्या अट्टाहासामुळे लाभार्थींना घरकुलापासून दूर राहावे लागले आहे. शिवाय …

Read More »

जागतिक मधमाशी दिनानिमित्त ग्रामस्थांना शेड नेट, साखर, प्लेट्सचे वाटप

  बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम सखी यांच्या वतीने २० मे रोजी जागतिक मधमाशी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आर आर फार्म बेनकनहळी येथे ग्रामस्थांना शेड नेट, साखर प्लेट्सचे वाटप करण्यात आले. पर्यावरणाचा समतोल राखण्यात मधमाशांचे महत्त्व अनन्यसाधारण असून, शेती उत्पादन वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. याबाबत जनजागृती …

Read More »

समितीचे ज्येष्ठ नेते अर्जुनराव नागोजी गोरल यांचे निधन

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते, माजी जिल्हा परीषद सदस्य श्री. अर्जुनराव नागोजी गोरल( वय 77) वर्षे यांचे शोचनीय निधन गुरुवार दिनांक 21-5-2026 रोजी दुपारी 2-30 वा. झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन कर्ते चिरंजीव, सुना व नातवंडे असा परिवार आहे. अंत्यविधी उद्या शुक्रवार तारीख 22 रोजी सकाळी 10:00 वाजता …

Read More »

बेळगावात रविवारी “संगीत आशा”

    बेळगाव : स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या सदाबहार’ गाण्यांवरं आधारित ‘संगीत आशा’ हा मराठी व हिंदी गीतांचा, कार्यक्रम रविवार दि. २४ सायंकाळी ५ वाजता लोकमान्य रंगमंदिरात आयोजित केला आहे. प्रा. दत्ता नाडगौडा, विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑप. सोसायटी व मराठी भाषाप्रेमी मंडळातर्फे सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती …

Read More »

सरदेसाई यांच्याकडील दुर्मिळ सांस्कृतिक ठेवा डिजीटाइज होणार?

    केंद्र सरकारने “ज्ञान भारतम्” योजनेअंतर्गत दुर्मिळ हस्तलिखित ग्रंथांचे डिजिटायझेशन करण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी विविध संस्थांना, मठांना, विद्यापीठांना तसेच खासगी संग्राहाकांना सहकार्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. खानापूरातील मराठी साहित्याचे जाणते अभ्यासक व म. ए. समितीचे दिवंगत नेते कै. उदयसिंग दत्ताजीराव सरदेसाई यांनी आपल्या आवडीतून गोळा केलेल्या त्यांच्या …

Read More »

ऑनलाइन फार्मसी बंद करण्याची बीडीआरपीएची सरकारकडे मागणी

  बेळगाव : सरकारने ऑनलाइन फार्मसी बंद कराव्यात या मागणीसाठी बेळगाव डिस्ट्रिक्ट रिटेल फार्मसी असोसिएशन (बीडीआरपीए) तर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून सरकारला निवेदन सादर करण्यात आले. ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट ऑर्गनायझेशनतर्फे आज बुधवारी सरकारने ऑनलाईन फार्मसी बंद कराव्यात या मागणीसाठी देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. त्याला पाठिंबा देणाऱ्या …

Read More »

७ व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी बैठक संपन्न

डी.बी. पाटील कार्यालयात नियोजन बैठक, तीन सत्रांची रूपरेषा जाहीर बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ७ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन-२०२६ येत्या २४ मे २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी, मराठा मंदिर, बेळगाव येथे संपन्न होणार आहे. या …

Read More »

धोकादायक बडेकोळ्ळमठ वळण दुरुस्तीसाठी एनएचएआयकडून 3 कोटी मंजूर

बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील (एनएच-48) बागेवाडी घाटातील बडेकोळ्ळमठ वळण अखेर दुरुस्त होणार असून, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) यासाठी तब्बल 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सतत होणारे अपघात आणि नागरिकांच्या वाढत्या चिंतेनंतर ही महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे. बेळगावपासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर असलेले हे वळण पावसाळ्यात …

Read More »

सावंतवाडी – चंदगड – बेळगाव प्रलंबित रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू करा

  कोल्हापूर: देशातील वाढती इंधन आयात, परकीय चलनाची घसरण आणि वाहतुकीच्या समस्यांवर मात करण्यासाठी कोल्हापूर व कोकण विभागातील प्रलंबित रेल्वे मार्ग तातडीने विकसित करण्यात यावेत, अशी मागणी ‘कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघ’ यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे करण्यात आली आहे.​ प्रवासी संघाने मुख्यमंत्र्यांचे लक्ष …

Read More »