बेळगाव – गोव्यातील कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे दि. 13 व 14 डिसेंबर रोजी म्हापसा येथे आयोजित 21 व्या शेकोटी साहित्य संमेलनात बेळगावचे पत्रकार व कवी सहभागी होणार आहेत. म्हापसा येथील प्रसिद्ध बोडगेश्वर मंदिराच्या आवारात होणा-या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी गोवा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. विनय मडगावकर असतील तर उद्घाटन नामवंत …
Read More »“मराठी” संदर्भात अल्पसंख्यांक आयुक्तांचे कर्नाटक सरकारच्या मुख्य सचिवाना पत्र
बेळगाव : बेळगावमधील मराठी भाषिकांच्या भाषिक अधिकारांचे संरक्षण करावे तसेच भाषिक अल्पसंख्यांक नागरिकांच्या सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करण्याच्या कार्यवाही करण्याचे निर्देश बेळगावच्या जिल्हाधिकारी आणि महानगर पालिका आयुक्तांना देण्यात याव्यात म्हणून केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे सहाय्यक आयुक्तांनी कर्नाटक सरकारच्या मुख्य सचिवाना पत्र पाठविले आहे. पत्रात असे लिहिण्यात आले आहे की, संविधानाच्या …
Read More »डी. वाय. सी. भरतेशची अंजली पाटील राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत ब्रांझ पदकाची मानकरी
बेळगाव : येथील भरतेश शिक्षण संस्था संचलित डी. वाय. सी. भरतेश हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी अंजली पाटील हिने 56+ वजन गटात राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त करून ब्रांझ पदकाची मानकरी ठरली आहे. अलीकडे ही स्पर्धा हैदराबाद येथे पार पडली होती. तिच्या यशाबद्दल आमच्या संस्थेचे आदरणीय सचिव श्री. विनोद दोड्डण्णावर …
Read More »मॉडेल मराठी शाळा येळ्ळूरमध्ये नूतन एसडीएमसी अध्यक्षपदी दिव्या कुंडेकर
स्मार्ट टीव्ही व तिजोरीचे उद्घाटन बेळगाव : येळ्ळूर येथील सरकारी मराठी मॉडेल शाळा येथे नूतन एसडीएमसी अध्यक्षा म्हणून सौ. दिव्या कुंडेकर यांची निवड झाली. 2023-26 या सालातील एसडीएमसी अध्यक्षा म्हणून सौ. रूपा धामणेकर त्याचबरोबर सौ. गायत्री बिर्जे या सदस्या म्हणून होत्या. सरकारच्या नियमानुसार त्यांचा कार्यकाल संपल्यामुळे नूतन एसडीएमसी अध्यक्षा …
Read More »…तर शहाजी महाराजांच्या समाधीचा शोधही लागला नसता : आम. मारुतीराव मुळे
बेळगाव (श्रीकांत काकतीकर) : छत्रपती शिवरायांना स्वराज्य स्थापनेचे ध्येय शहाजी महाराजांनी दिले. शहाजीराजांनी दक्षिणेत अनेक वर्ष व्यतीत केले. बेंगळूर शहराच्या विकासाचा पाया शहाजीराजांनी रचला. गोदेगेरी येथील गावकऱ्यांना जंगली श्वापदांचा होणारा त्रास रोखण्यासाठी शिकारीला जात असताना घोड्यावरून पडून गोदेगेरी येथे शहाजीराजांचा मृत्यू झाला. गोदेगेरी येथे एका दगडाच्या स्वरूपात असलेल्या समाधीचा …
Read More »चांद शिरदवाड परिसरातील शेतकऱ्यांचा विधानसौधला घेरावो घालण्याचा संकल्प
निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न संदर्भात कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार अनेक वर्षापासून रस्त्यावरची लढाई लढून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही अनेक समस्या तशाच असून त्यांच्या सोडवणुकीसाठी विधानसौधला रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी गुरुवारी (ता.११) घालणार आहेत. त्यामध्ये चांद शिरदवाड परिसरातील संघटनेचे कार्यकर्ते व …
Read More »“त्या” अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आता धाबा मालकही अटकेत
बेळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेल्या प्रकरणात अत्याचार करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याच्या आरोपावरून धाबा मालकावरही गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. देसुर क्रॉसजवळील जगदंब धाब्याचा मालक संतोष मरगाळे (वय 40) याच्यावर पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेळगावच्या दक्षिण …
Read More »शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी रयत संघटनेची उद्या विधानसौधला धडक
निपाणी (वार्ता) : अतिवृष्टी, महापूर काळात तालुक्यातील सोयाबीन, ऊस, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल खात्यातर्फे त्याचा सर्वे झाला असला तरी अनेक शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. शिवाय शेती पाणी पुरवठ्यासाठी दहा तास वीजपुरवठा करण्याच्या मागणीसाठी उद्या गुरुवारी (ता.११) विधानसौधला कर्नाटक राज्य रयत संघटना धडक देणार आहे. त्याबाबत …
Read More »समितीच्या जीवावर पदे भूषविलेले आजी-माजी लोकप्रतिनिधी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून अलिप्त!
बेळगाव : कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्याला आजी-माजी लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याने मराठी भाषिकातून तीव्र नाराजी पसरली आहे. समितीच्या विद्यमान नगरसेवकांनी महामेळाव्याकडे पाठ फिरविल्याने शहरात चर्चेचा विषय बनला आहे. आजवर समितीने सामान्य कार्यकर्त्याला ग्रामपंचायत सदस्यापासून तालुका पंचायत, जिल्हा पंचायत, महानगरपालिका त्याचबरोबर आमदारकी देखील बहाल …
Read More »मच्छे शाळा सुधारणा कमिटी अध्यक्षपदी गजानन छप्रे
मच्छे : गावातील सरकारी मॉडेल प्राथमिक केंद्र शाळा, मच्छे येथे शाळा सुधारणा समितीची सर्वानुमते नुकतीच निवड करण्यात आली. अध्यक्षपदी गजानन कृष्णा छप्रे तर उपाध्यक्षपदी सौ. मोहिनी अमित बाळेकुंद्री यांची निवड करण्यात आली. पालक, शिक्षक तसेच स्थानिक सदस्यांचा या समितीत समावेश असून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी समिती कटिबद्ध राहणार असल्याचे नूतन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta