Monday , August 24 2026
Breaking News

वाघवडे हायस्कूलमध्ये दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Spread the love

 

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित वाघवडे हायस्कूल येथे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर. के. पाटील होते.

शाळेचे मुख्याध्यापक भारत पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तर यल्लाप्पा पाटील यांनी श्रीफळ वाढविले. माजी मुख्याध्यापक एम. टी. आंबोळकर यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले.

या सोहळ्यात परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शाळा सुधारणा समितीचे सदस्य व्यंकट गुरव यांनी प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे दोन हजार आणि एक हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिले.

तसेच, बेळगाव व मुंबई येथे झालेल्या भाषण स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल कु. भक्ती केन्नुरकर हिचाही विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला रमाकांत बुवाजी, प्रशांत देसाई यांच्यासह शाळा सुधारणा समितीचे सदस्य, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर पाटील यांनी केले, तर आभार ए. एम. साबळे यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

दिल्लीमध्ये झालेल्या कार अपघातात आमदार अभय पाटील जखमी

Spread the love    दिल्ली : बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांच्या कारला रविवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *