
बेळगाव : मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगावच्या सांस्कृतिक समितीच्या वतीने “निसर्ग आणि वन्यजीव” या विषयावर आयोजित करण्यात आलेली भाजीपाला व फळ कोरीवकला स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
या स्पर्धेत डी.फार्म., बी.फार्म. आणि एम.फार्म. विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध प्रकारच्या भाजीपाला व फळांपासून आकर्षक व कल्पक कलाकृती साकारल्या. विद्यार्थ्यांनी निसर्ग व वन्यजीव संवर्धनाचा संदेश आपल्या कलाकृतींतून प्रभावीपणे मांडला.
स्पर्धेचे परीक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. विष्णू कंग्राळकर आणि ग्रंथपाल, संजय गावडे यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व कलात्मक सादरीकरणाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, सौंदर्यदृष्टी आणि पर्यावरणाविषयीची जागरूकता वृद्धिंगत होत असल्याचे सांगितले.
या स्पर्धेचे आयोजन डॉ. देविका कोटेकर (कार्यक्रम समन्वयक), डॉ. सुमा नडुविनमनी (सांस्कृतिक समिती समन्वयक) आणि डॉ. सविता एम. उळ्ळेगड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्पर्धेला विशेष रंगत प्राप्त झाली.

Belgaum Varta Belgaum Varta