Monday , August 24 2026
Breaking News

बंगळूरच्या दगड खाणीत भीषण दुर्घटना; दरड कोसळून ९ मजुरांचा मृत्यू

Spread the love

 

बंगळूर : कर्नाटकची राजधानी बंगळूर येथे गुरुवारी पहाटे दगड खाणीत भीषण दुर्घटना घडली. बंगळूर दक्षिण तालुक्यातील मदापटना परिसरातील एका दगड खाणीत अचानक दरड कोसळल्याने ९ मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक मजूर गंभीर जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली काही मजूर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खाणीत दगड फोडण्याचे व उत्खननाचे काम सुरू असताना सुमारे ४० फूट उंचीवरून मोठा दगड कोसळला. त्यावेळी सुमारे १८ मजूर काम करत होते. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले सर्व मजूर बिहार राज्यातील असून ते स्टोन क्रशर साइटवर रोजंदारीवर काम करत होते.

घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. ढिगारा हटवून जखमी मजुरांना बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर जवळील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, पोलिसांनी परिसर सील करून दुर्घटनेचा तपास सुरू केला आहे. खाणीतील सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले होते का, तसेच दरड कोसळण्यामागील नेमके कारण काय, याचा शोध घेतला जात आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटकातील बनावट औषधांचे देशभरात जाळे

Spread the love अनेक राज्यांपर्यंत विस्ताराची शक्यता बंगळूर : तावरेकेरे येथील दोड्डेरी परिसरात उघडकीस आलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *