Monday , August 24 2026
Breaking News

मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसीच्या डी. फार्मसी प्रथम वर्षाच्या परीक्षेत विद्यार्थिनींची उज्ज्वल कामगिरी

Spread the love

 

बेळगाव : मराठा मंडळ संचलित कॉलेज ऑफ फार्मसीच्या डी. फार्मसी प्रथम वर्षाच्या मार्च २०२६ वार्षिक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, महाविद्यालयाने ९४ टक्के निकालाची उल्लेखनीय नोंद केली आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
परीक्षेत कु. वैष्णवी हेमंत निकम हिने ७३२ गुण (७३.२ टक्के) मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कु. चंद्रभागा रुपाजी चौगुले हिने ७२९ गुण (७२.९ टक्के) मिळवून द्वितीय क्रमांक, तर कु. प्रणाली परशराम पाटील हिने ७२३ गुण (७२.३ टक्के) मिळवून तृतीय क्रमांक संपादन केला.
विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल मराठा मंडळच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू कंग्राळकर, प्राध्यापकवृंद तसेच व्यवस्थापन मंडळाने त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

CEIRच्या मदतीने मार्केट पोलिसांनी शोधले १२३ हरवलेले मोबाईल

Spread the love  बेळगाव : नागरिकांचे हरवलेले मोबाईल फोन शोधण्यासाठी केंद्रीय उपकरण ओळख नोंदणी (CEIR) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *